Tukaram Mundhe : अकोल्यात तुकाराम मुंढेंच्या धाक; हजारो पेप्सी फेकल्या रस्त्यावर…वाचा सविस्तर प्रकरण

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर धडक कारवाई

152
Discarded Pepsi products found on roadside in Akola.
Large quantities of Pepsi products were found discarded on the roadside.

Tukaram Mundhe Akola : अकोला-अकोट मार्गावरील पळसोद फाट्याजवळ, कुल्फी प्रकारातील ‘पेप्सी’ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत फेकून दिलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अकोल्यात FDA आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या पथकाने अलीकडेच तपासणी मोहीम राबविल्यानंतर अनेक विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाल्याची चर्चा असून, त्यामुळेच कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांनी संशयित मालाची विल्हेवाट लावली असावी, असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

फेकून देण्यात आलेल्या पेप्सींची गुणवत्ता, त्यांची उत्पादन तारीख किंवा त्यामध्ये भेसळीचा कोणताही प्रकार होता का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अशाप्रकारे उघड्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर संबंधित माल कुठून आणण्यात आला, तो कोणाचा होता आणि तो फेकून देण्यामागचे नेमके कारण काय, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तपास केल्यास या प्रकरणामागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.अज्ञात व्यक्तींनी किंवा दुकानदारांनी टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: NEET पुनर्परीक्षेपूर्वी सरकारची मोठी कारवाई; २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर बंदी, जाणून घ्या कारण

FDA च्या प्रमुख कारवाया

1. राज्यव्यापी ‘पेप्सी’ आणि बर्फ तपासणी मोहीम FDA ने मे-जून महिन्यात राज्यभरात बर्फाच्या कांड्या, पेप्सी, कुल्फी आणि फ्लेवर्ड आईस उत्पादनांची तपासणी सुरू केली. अनेक ठिकाणी परवान्याविना उत्पादन, अस्वच्छ पाणी, कृत्रिम रंग आणि निकृष्ट दर्जाचे घटक वापरल्याचे प्रकार समोर आले.

2. शिर्डी परिसरातील पेढ्यांवर कारवाई – शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात विक्री होणाऱ्या पेढ्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि शुद्धता तपासण्याचे आदेश देण्यात आले होते.

3. दूध व दुग्धजन्य पदार्थांवर विशेष लक्ष – राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दूध, पनीर, तूप आणि मावा यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. भेसळ आढळल्यास उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. 

4. शीतपेये आणि ज्यूस विक्रेत्यांवर धाड – रस्त्याकडील ज्यूस सेंटर, शरबत विक्रेते आणि थंड पेय उत्पादक यांची तपासणी करण्यात आली. उत्पादन प्रक्रियेत स्वच्छतेच्या नियमांचे पालन होते का, यावर भर देण्यात आला.

5. परवान्याशिवाय चालणाऱ्या युनिट्सवर कारवाई – FDA ने अनेक ठिकाणी परवान्याशिवाय चालणाऱ्या अन्न उत्पादन युनिट्सवर छापे टाकून उत्पादन जप्त केले. काही ठिकाणी उत्पादन बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.

हेही वाचा: Monsoon 2026 : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत पावसाची स्थिती कशी राहणार? काय सांगतो IMD rain alert

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.