-
प्रतिनिधी
DCM Eknath Shinde मुंबईत यंदा पावसाळा लांबणीवर पडल्याने यंत्रणांना तयारीसाठी अतिरिक्त संधी मिळाली असली, तरी आता येणाऱ्या पावसाचा सामना करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. मुंबईत ‘शून्य जीवितहानी’ हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पावसाळापूर्व नियोजनाचा धडाकेबाज आढावा घेतला. विशेष म्हणजे, या बैठकीत मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणानंतर खड्डे दुरुस्तीचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करत, त्यांनी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. (DCM Eknath Shinde)
नालेसफाईसह होल्डिंग पाँड्सची कार्यक्षमता तपासणे, दरडप्रवण क्षेत्रांत संरक्षक जाळ्या बसवणे आणि होर्डिंग्जचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करणे, असे कडक निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले आहेत. केवळ महापालिकेवर अवलंबून न राहता, एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने स्वतःचे सक्षम आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यावर त्यांनी भर दिला. पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेली पाण्याची टंचाई आणि संभाव्य अतिवृष्टी यांचा समतोल कसा राखायचा, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (DCM Eknath Shinde)
यावेळी प्रशासकीय यंत्रणांना ‘टीम’ म्हणून काम करण्याचे आवाहन करत, रेल्वे ट्रॅकवरील नालेसफाईपासून ते मेट्रो स्थानकांपर्यंत पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात स्मार्ट पंप मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली असून, महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून या पंपिंग स्टेशनवर आता थेट लक्ष ठेवले जाणार आहे. (DCM Eknath Shinde)
मुंबईतील पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी तैनात करण्यात आलेली आपत्ती मित्रांची फौज, नौदल आणि एनडीआरएफची पथके कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलत असल्याचा दावा होत असतानाच, मान्सूनच्या पहिल्या जोरदार सरींमध्ये ही यंत्रणा कितपत यशस्वी ठरते, याकडे आता सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (DCM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

