America : अमेरिका-इराण पॅचअप; कतारने मारली बाजी, पाकिस्तानची झाली गोची

ट्रम्प यांनी कतारचे कौतुक करताना युएईलाही चिमटा काढला आणि कतारचे अमीर किती 'शूर' आहेत, याचे गोडवे गायले. बिचारा पाकिस्तान...'आम्ही एवढी मेहनत केली आणि नाव कतारचे झाले!' अशी काहीशी त्यांची अवस्था झाली आहे.

81
Leaders from America, Iran, and Pakistan during a diplomatic event.
Key leaders from America, Iran, and Pakistan gather for discussions.

युद्ध थांबल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर उडी मारली. जणू काही त्यांनीच स्वतः बॉर्डरवर जाऊन दोन्ही देशांना शांत केले आहे, अशा थाटात पाकिस्तानने मध्यस्थीचे श्रेय घेण्याचा घाट घातला. पण अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत पाकिस्तानच्या आनंदावर विरजण घातले. ट्रम्प थेट म्हणाले, पाकिस्तान वगैरे काही नाही, कतार हाच आमचा खरा ‘किंगमेकर’ आहे! ट्रम्प यांनी कतारचे कौतुक करताना युएईलाही चिमटा काढला आणि कतारचे अमीर किती ‘शूर’ आहेत, याचे गोडवे गायले. बिचारा पाकिस्तान…’आम्ही एवढी मेहनत केली आणि नाव कतारचे झाले!’ अशी काहीशी त्यांची अवस्था झाली आहे.

दुकान उघडले, पण गिराईकच फिरकले नाही!

पाकिस्तानने जागतिक पातळीवर आपली ‘भयावह’ प्रतिमा सुधारण्यासाठी या युद्धात मध्यस्थीची खूप नाटके केली. पण प्रत्येक वेळी त्यांची ‘स्क्रिप्ट’ फ्लॉप ठरली. ट्रम्प यांचा पाकिस्तानवरचा विश्वास आधीच डळमळीत होता, आणि इस्रायल तर पाकिस्तानला भाव द्यायलाच तयार नव्हता (जणू काही त्यांनी पाकिस्तानला ‘रॉन्गम नंबर’ समजून ब्लॉक करून टाकले होते). अखेर, पाकिस्तानला बाजूला सारून कतारने मधल्या गल्लीतून येत ‘डील फायनल’ केली! (America)

(हेही वाचा अमेरिका-इराणमध्ये युद्ध समाप्तीचा ऐतिहासिक करार; PM Narendra Modi यांची पहिली प्रतिक्रिया)

स्वित्झर्लंडची थंड हवा आणि ‘बड्या’ लोकांच्या स्वाक्षऱ्या

करार आशियात झाला, मध्यस्थी कतारने केली, क्रेडिट पाकिस्तानला हवे होते…पण स्वाक्षरी करण्यासाठी जागा कोणती निवडली? तर युरोपमधील जिनिव्हा (स्वित्झर्लंड)! कदाचित आशियातल्या गरम वातावरणात नेत्यांचे डोके पुन्हा फिरू नये, म्हणून त्यांना जिनिव्हाच्या थंड हवेत बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. (America)  थोडक्यात काय तर अमेरिका (America) आणि इराणचे युद्ध होते, मध्यस्थी कतारने केली. फुकटचे क्रेडिट पाकिस्तान घेत आहे, करारावर स्वाक्षरी स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे. यालाच म्हणतात, “लग्न कतारचे आणि नाचतोय पाकिस्तान!”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.