Water Cut : एल निनोचा फटका अन् डोंबिवली-कल्याण-उल्हासनगरला २४ तास पाणीबंदचा झटका

एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील पुरवठ्यावर परिणाम

138
Water Cut : एल निनोचा फटका अन् डोंबिवली-कल्याण-उल्हासनगरला २४ तास पाणीबंदचा झटका
  • कल्याण, प्रतिनिधी

Water Cut                    उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत असली तरी कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवलीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जाहीर केलेल्या सुचनेनुसार, अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्याने पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई टाळण्यासाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Water Cut)

भारतीय हवामान खात्याने घोषित केल्यानुसार यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत पेयजलाचे नियोजन करण्याचे निर्देश सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्यात आले आहेत. त्यानुसार याबाबत जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सर्व महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व अन्य प्राधिकरणांनी वेळोवेळी समन्वयाने पाणीकपात करण्याचे ठरले आहे. (Water Cut)

(हेही वाचा – NEET 2026 Exam: पुनर्परीक्षेपूर्वीच सर्व्हर क्रॅश, परीक्षेआधीच विद्यार्थ्यांची चिंता वाढली)

त्यानुसार एमआयडीसीच्या जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कापतीचा फटका डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि परिसरातील इतर ग्रामपंचायतींना बसणार आहे. या संदर्भात एमआयडीसीने रहिवाशांसह उद्योगांना आवाहन केले आहे. (Water Cut)

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी कापतीपूर्वी मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून पाणी टंचाई निर्माण होणार नाही. जलसंपदा विभागासोबत ९ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे, आगामी काळात पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. (Water Cut)

(हेही वाचा – Ind vs Afg, ODI Match : गुरबाझने आपल्या शतकाचं श्रेय गौतम गंभीरला का दिलं?)

जलसंपदा विभागाने दिलेल्या सूचनांनुसार एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी या सूचनेची प्रत कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका आयुक्त, तळोजा-डोंबिवली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामपंचायती, ग्राहक रहिवासी आणि पाणी पुरवठ्याच्या इतर ग्राहकांनी या सूचनेची दखल घेऊन पाण्याचे नियोजन करावे. पाण्याचा पुरेसा साठा करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.