घाई करू नका, अन्यथा दुबार पेरणीचे संकट! Monsoon लांबल्याने कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा

102
Monsoon
Monsoon

भारतीय हवामान विभागाने (Monsoon) राज्यात 15 जून 2026 रोजी मान्सूनचा पाऊस येण्याचा अंदाज दिला होता. मात्र, मान्सून अजून अरबी समुद्रातच आहे. मॉन्सून अरबी समुद्रातून पुढे वाटचाल करताना दिसत नाही. एकाच ठिकाणी आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्याने मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला. आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होईल. या अंदाजानुसार, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Monsoon)

हेही वाचा-Noida International Airport वर पहिले व्यावसायिक विमान यशस्वीरित्या उतरले, १७० शेतकरी लखनौला पोहोचणार; केवळ…

शेतकऱ्यांनी शेत पेरणीसाठी तयार ठेवले. नांगरनी झाली, घरात बिय बियाने, खते आणून टाकली आहेत. मात्र, वरूण राजा काही बरसताना दिसत नाहीये. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. यंदा पाऊस कमी पडण्याचा इशारा देण्यात आला. त्यात एल निनोचे वेगळे संकट उभे आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. फक्त राज्यातीलच नाही तर देशातील मॉन्सून आजच्या घडीला धोक्यात आहे. 20 जूनच्या पावसाकडून सर्वांना अपेक्षा आहेत. (Monsoon)

मॉन्सूनचा पाऊस 20 जूनला राज्यात दाखल होईल. त्यानंतर कृषी विभाग शेतकऱ्यांना पेरण्याबद्दल आवाहन करेल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोठा इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून आवाहन केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. जर आता पेरण्या केल्या तर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. (Monsoon)

हेही वाचा- FSSAI ची तीन मोठ्या ब्रँड्सवर कारवाई! मॅगी, KFC आणि फ्लिपकार्ट मिनिट्सला नोटीस; ‘त्या’ व्हिडीओमुळे खळबळ!

मॉन्सूनचा पाऊस जरी 20 जूनला दाखल होण्याचा अंदाज असला तरीही अजूनही तो अंदाजच आहे. अगोदर 15 जूनला मॉन्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, मॉन्सून पुढे गेला. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना मोठे आवाहन करत म्हटले की, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ज्यावेळी सांगितले जाईल, त्यावेळी पेरण्या कराव्यात. (Monsoon)

अरबी समुद्रात मॉन्सून दाखल झाला. मात्र, तो एकाच ठिकाणी रेंगाळला आहे. पुढील 3-4 दिवसात मॉन्सून पुढे वाटचाल करण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत मॉन्सून पूर्णपणे मुंबईसह राज्यात दाखल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. पेरण्या रखडल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. (Monsoon)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.