IPL 2026 Playoff Scenarios : राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर पंजाब, चेन्नईच्या बाद फेरी प्रवेशाला सुरुंग

IPL 2026 Playoff Scenarios : राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर पंजाब, चेन्नईच्या बाद फेरी प्रवेशाला सुरुंग

95
IPL 2026 points table : शेवटच्या दिवशी ठरला गुण तालिकेतील चौथा संघ, कुठला संघ पोहोचला बाद फेरीत?
IPL 2026 points table : शेवटच्या दिवशी ठरला गुण तालिकेतील चौथा संघ, कुठला संघ पोहोचला बाद फेरीत?
  • ऋजुता लुकतुके 

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर मिळवलेल्या महत्त्वाच्या विजयामुळे आयपीएल २०२६ची प्लेऑफ(IPL 2026 Playoff Scenarios)शर्यत आणखी रंगतदार झाली आहे. मात्र हा निकाल चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.(IPL 2026 Playoff Scenarios)

जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने २२१ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत ९३ धावांची तुफानी खेळी केली, तर ध्रुव जुरेलनेही अर्धशतक झळकावले. या विजयामुळे राजस्थानचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आणि संघ चौथ्या स्थानावर पोहोचला. शिवाय शेवटच्या साखळीत मुंबईविरुद्ध त्यांनी आणखी दोन गुण मिळवले तर गुणांच्याच आधारे ते बाद फेरीत जाऊ शकतील.(IPL 2026 Playoff Scenarios)

राजस्थानच्या या विजयामुळे आता समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. जर राजस्थानने मुंबई इंडियन्सविरुद्धचा अखेरचा सामना जिंकला, तर त्यांचे १६ गुण होतील आणि त्यांचे प्लेऑफ स्थान जवळपास निश्चित होईल. अशा परिस्थितीत चेन्नई, पंजाब आणि कोलकातासाठी मार्ग कठीण होऊ शकतो.(IPL 2026 Playoff Scenarios)

(हेही वाचा – Crime News: कर्नल हिमांशु बालीला सीबीआयकडून अटक, ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप )

चेन्नई सुपर किंग्जसाठी आता प्रत्येक सामना ‘करो या मरो’चा बनला आहे. त्यांना उर्वरित सामने जिंकण्याबरोबरच इतर निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. चेन्नईचा नेट रनरेटही फार मजबूत नसल्याने त्यांची अडचण वाढली आहे.(IPL 2026 Playoff Scenarios)

पंजाब किंग्जचीही परिस्थिती तणावपूर्ण आहे. सलग पराभवांमुळे पंजाबची घसरण झाली असून आता त्यांना लखनौविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. मात्र त्यानंतरही राजस्थान किंवा चेन्नईच्या निकालांवर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.(IPL 2026 Playoff Scenarios)

कोलकाता नाईट रायडर्ससाठी समीकरण आणखी कठीण आहे. कोलकात्याला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्याचवेळी इतर संघांच्या पराभवाची आशा ठेवावी लागणार आहे. नेट रनरेटही त्यांच्या विरोधात जाऊ शकतो.(IPL 2026 Playoff Scenarios)

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष चौथ्या आणि अखेरच्या जागेकडे लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदाची प्लेऑफ शर्यत शेवटच्या लीग सामन्यापर्यंत रंगण्याची शक्यता आहे.(IPL 2026 Playoff Scenarios)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.