Crime News: कर्नल हिमांशु बालीला सीबीआयकडून अटक, ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप

84
Crime News: कर्नल हिमांशु बालीला सीबीआयकडून अटक, ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप
Crime News: कर्नल हिमांशु बालीला सीबीआयकडून अटक, ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप

Crime News: सीबीआयने (CBI) भारतीय लष्करात  (Indian Army) कार्यरत असलेल्या कर्नलला ५० लाखांच्या लाच प्रकरणी अटक केलीय. आरोपी लष्करी अधिकाऱ्याचं नाव कर्नल हिमांशु बाली असं आहे. सध्या तो कोलकात्यात ईस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी ऑर्डनेन्स कॉर्म्समध्ये तैनात आहे. कर्नल हिमांशुवर आरोप आहेत की त्याने लष्कराचं टेंडर देण्याच्या नावाखाली कानपूरच्या एका कंपनीला फायदा होण्यासाठी पदाचा गैरवापर केला.

कर्नल हिमांशु बालीवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कानपूरमधील ईस्टर्न ग्लोबल लिमिटेडला लष्कराचं टेंडर देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपास यंत्रणांनी दावा केला की, वर्षाच्या सुरुवातीला लाचेच्या बदल्यात कंपनीला एक मोठं टेंडर देण्यात आलं. कर्नलला अटक झाली असून त्याच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – ईशान्य भारताच्या सुरक्षेसाठी मोठी मोर्चेबांधणी! पश्चिम बंगालकडून ‘Chicken Neck Corridor’साठी केंद्र सरकारला 120 एकर जमीन

लाच घेऊन पदाचा गैरवापर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्टर्न ग्लोबल लिमिटेडनं कंत्राट मिळवण्यासाठी वाढीव बिलं सादर करून ती मंजूर करून घेण्यासाठी लाच दिली होती. कर्नल बालीने एक खासगी कंत्राटदार आणि त्याच्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेऊन पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. २२ एप्रिलला कर्नल हिमांशु बालीने कोलकात्यातल्या पार्क स्ट्रीट भागात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर ४८ तासात कंत्राट देण्यात आलं होतं.

कर्नल बाली याने १६ मे रोजी लाचेची उर्वरित ५० लाखांची रक्कम मागितली होती. लाचेची ही रक्कम हवाला नेटवर्कच्या माध्यमातून कर्नलला पोहोचवली जाणार होती. कंत्राट देत असताना नियमांना धाब्यावर बसवत दर्जा नसलेल्या नमुन्यांना मंजुरी दिली होती. खोटी बिलंही मंजूर केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.