-
ऋजुता लुकतुके
राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Sooryavanshi 93)आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शानदार खेळीनंतर त्याला संघमालक संजीव गोयंका यांच्याकडून उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिवादन मिळाले. हा क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्याचे जोरदार कौतुक केले जात आहे.(Vaibhav Sooryavanshi 93)
या सामन्यात वैभवने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करत राजस्थानला मजबूत स्थितीत नेले. कमी वयात दबावाखाली केलेली त्याची परिपक्व फलंदाजी पाहून क्रिकेटविश्व प्रभावित झाले आहे. सामना संपल्यानंतर संजीव गोएंका स्वतः त्याच्याजवळ गेले आणि त्याचे अभिनंदन केले. गोएंकांनी उभे राहून दिलेल्या टाळ्यांचा क्षण अनेक चाहत्यांनी “भविष्यातील सुपरस्टारला मिळालेला सन्मान” असे म्हटले आहे.(Vaibhav Sooryavanshi 93)
(हेही वाचा – सावरकर : काल, आज आणि उद्या; Vasai मध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन )
सामना संपल्यानंतर वैभवनेही हा क्षण “आशीर्वाद आणि अमूल्य अनुभव” असल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या व्यक्तीकडून कौतुक मिळणे हे स्वतःसाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्याने व्यक्त केली. सामना संपल्यानंतर पुढील लिलावात तुझ्यावर बोली लावेन, असंही गोयंका त्याला गमतीने म्हणाले.(Vaibhav Sooryavanshi 93)
Sanjiv Goenka giving a standing ovation to Vaibhav Sooryavanshi 🔥 pic.twitter.com/irXq8Gwvs5
— Deepak paswan (@PaswanDeep12610) May 19, 2026
यंदाच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी सातत्याने चर्चेत राहिला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी त्याने अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या असून कमी वयात अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. त्याच्या निर्भीड फलंदाजीमुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्याकडे भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा स्टार म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.(Vaibhav Sooryavanshi 93)
विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलिअर्सनेही अलीकडेच वैभवचे कौतुक करत त्याच्यात सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्याच्या मते, वैभवकडे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारात मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे.(Vaibhav Sooryavanshi 93)
दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममध्येही वैभवच्या कामगिरीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. युवा खेळाडू असूनही त्याने दाखवलेला आत्मविश्वास आणि मोठ्या सामन्यांतील कामगिरी संघासाठी मोठा सकारात्मक मुद्दा ठरत आहे.(Vaibhav Sooryavanshi 93)
सोशल मीडियावर चाहत्यांनी या क्षणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत. अनेकांनी “ही फक्त सुरुवात आहे” अशी प्रतिक्रिया देत वैभवच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.(Vaibhav Sooryavanshi 93)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

