सिडको क्षेत्रात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; मंत्री Ashish Shelar यांचा मोठा निर्णय

93
महात्मा फुलेंचे समग्र वाङमय सात भाषांमध्ये अनुवाद; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा
  • प्रतिनिधी

Ashish Shelar                     ​नवी मुंबईच्या शिरपेचात लवकरच मानाचा तुरा रोवला जाणार असून, येथे जागतिक दर्जाचे एक भव्य आणि आधुनिक स्टेडियम उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन तातडीने पूर्ण करून कनेक्टिव्हिटी, पार्किंग आणि पायाभूत सुविधांचा विचार करत योग्य जागेची निवड करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. (Ashish Shelar)

​मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत या भव्य प्रकल्पाचे सुतोवाच करण्यात आले. या बैठकीला उरणचे आमदार महेश बाल्दी आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईत प्रस्तावित असलेल्या ‘स्पोर्ट्स सिटी’ क्षेत्रातच हे स्टेडियम उभारण्याचा मुख्य पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ५० टक्के जमिनीचे संपादन आधीच पूर्ण झाले असून, उर्वरित जागा टप्प्याटप्प्याने ताब्यात घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या आहेत. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Mahatma Jyotirao Phule यांच्या द्विशताब्दी जयंतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘मेगा प्लॅन’)

​प्रारंभिक अंदाजानुसार, या जागतिक दर्जाच्या स्टेडियमसाठी सुमारे ४० एकर जागा आणि इतर पूरक सोयी-सुविधांसाठी अतिरिक्त ३० एकर जागा लागणार आहे. हा प्रकल्प केवळ खेळासाठीच नाही, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कामासाठी तातडीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Ashish Shelar)

​प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेता, एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत या संदर्भातील सविस्तर प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी पुनरावलोकन बैठक घेतली जाणार आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम केल्यास नवी मुंबईत जगाचे लक्ष वेधून घेणारे क्रीडा संकुल लवकरच उभे राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.