अमेरिकेच्या सैन्याने Pakistan मध्ये गोळ्या झाडून १० जणांना केले ठार; कधी आणि केव्हा?

अमेरिकेने पाकिस्तानला दणका देत सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केली आहेत.

128
Security personnel outside the US embassy in Karachi, Pakistan.
Security forces are stationed outside the US embassy in Karachi.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात (Pakistan)आक्रोश पसरला. संतापलेल्या लोकांनी कराची येथील अमेरिकेच्या दूतावास कार्यालयाला टार्गेट केले. या हल्ल्याविषयी नवीन माहिती समोर आली आहे. रविवारी अमेरिकन दूतावास कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. ज्यात कमीत कमी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा गोळीबार पाकिस्तानी (Pakistan) पोलिसांकडून नव्हे तर अमेरिकन लष्कराने केला होता. त्याशिवाय अमेरिकेने पाकिस्तानला दणका देत सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केली आहेत.

अमेरिकन दूतावास कार्यालय परिसरात एखाद्या लष्कराने गोळीबार करण्याची दुर्लभ घटना मानली जाते. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात (Pakistan) लोकांनी आक्रमक होत दूतावास कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिथल्या सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. आता हा गोळीबार पाकिस्तानी पोलिसांनी केला की अमेरिकन आर्मीने केला याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत गोळीबार आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्याचे दिसते. काही व्हिडिओत एक आंदोलनकारी दूतावासाच्या दिशेने शस्त्र दाखवताना दिसतो. पाकिस्तानात (Pakistan) इराणच्या समर्थनार्थ अनेक शहरात लोक रस्त्यावर आले आहेत. देशात कमीत कमी २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारने मोठ्या जमावाला निर्बंध घातले आहेत.

(हेही वाचा जिहादी मुसलमानाने Hindu युवतीचे केले अपहरण; विरोधानंतर पोलिसांनी आझमला केली अटक)

अमेरिकेने व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केल्या

अमेरिकन दूतावासाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केले आहेत. हा आदेश इस्लामाबाद दूतावासासोबत लाहोर आणि कराची इथल्या दूतावासावरही लागू आहे. येत्या ६ मार्चपर्यंत सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द करण्यात आल्या आहेत. कराची येथे अमेरिकन दूतावासाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेत. लाहोर आणि इस्लामाबाद येथेही अमेरिकन कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान (Pakistan) हा जगातील दुसरा सर्वात मोठा शिया समुदाय असलेला देश आहे. त्यामुळे इराणमधील घटनेचे पडसाद पाकिस्तानात वेगाने उमटले. जर पाकिस्तानातील ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांत बिघाड होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.