सध्या इराण विरुद्ध इस्राईल-अमेरिका हे युद्ध (Iran Israel War) पेटले आहे. या युद्धात इस्राईलचे प्रमुख आयातुल्ला खामेनेई यांना अमेरिका आणि इस्राईल यांनी संयुक्त हल्ल्यात ठार केले. त्यानंतर आता जगभरातील मुस्लिम धर्मातील शिया पंथीय मुसलमान संतापले असून रस्त्यावर उतरले आहे. भारतातही शिया मुसलमानांनी आंदोलने सुरु केली आहेत. वरवर पाहता हे युद्ध पश्चिमी देश विरुद्ध इराण असा संघर्ष दिसत असला तरी या युद्धात सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, कुवेत, कतार या सुन्नी पंथीय इस्लामी राष्ट्रांनी अमेरिकेला मदत केल्याने इराणने या देशांमधील अमेरिकेच्या दूतावासांवर हल्ला केला आहे. यावर आता सौदीने इराणला दम भरला आहे. यावरून हा संघर्ष इराण-इस्राईल युद्धाच्या (Iran Israel War) आडून पारंपरिक शिया-सुन्नी असा सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत हे युद्ध मुस्लीम देशांमध्ये सुरु झाले तर आश्चर्य वाटू नये.
इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील ऐतिहासिक जामकरण मशिदीवर लाल रंगाचा झेंडा फडकावला आहे. हा लाल झेंडा म्हणजे सूडाची नांदी असल्याचे मानले जात आहे. कारण या झेंड्यावर इमान हुसेन यांचा बदला असे शब्द लिहिलेले होते. पण हे इमान हुसेन कोण आहेत? त्यांच्या या बदल्याचा काय संदर्भ आहे? मशिदीवर लावलेल्या लाल झेंड्याचा नेमका अर्थ काय? हे सगळे समजून घ्यावे लागेल. कारण यातच शिया-सुन्नी संघर्षाचा इतिहास दडलेला आहे. (Iran Israel War)
(हेही वाचा UAE Warn Iran : तुमचे युद्ध आमच्याशी नाही, शहाणपणाने वागा; अन्यथा…; इराणच्या हल्ल्यानंतर सौदीचा इशारा)
करबलातील ‘त्या’ युद्धाची जखम पुन्हा भळभळली
इमाम हुसेन म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा नातू. इमाम हुसेन 680 च्या करबलाच्या युद्धात मारले गेले. करबलाचे हे युद्ध वांशिक संघर्ष होता. त्या युद्धानंतर मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी अशी फूट पडली. काही रिपोर्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. सुन्नी परंपरेत खलिफा राज्य चालवतो, तर शिया परंपरेत इमामची निवड करणे ग्राह्य धरले जाते. इमाम म्हणजे पैगंबरांचे थेट वंशज. करबलाची लढाई मोहम्मद पैगंबराचे नातू इमाम हुसैन आणि खलिफा उमय्यद वंशाचे यजीद यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. पैगंबराच्या मृत्यूनंतर उमय्या वंशातल्या लोकांनी धर्माची आणि सत्तेची सगळी सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. हुसैन यांनी इस्लामच्या सिद्धांताचा आधार देत यजीदचे नेतृत्व स्वीकारायला नकार दिला आणि त्यानंतर करबलाचे युद्ध पेटले. इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहरमच्या महिन्यात दहाव्या दिवशी इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांचा मृत्यू झाला. तेव्हापासून शिया-सुन्नी हा संघर्ष सुरु असून तो आजतागायत सुरु आहे. या दिवसाचे शिया मुस्लिमांसाठी भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे मोहरमच्या काळात शिया मुस्लिम आजही ताजिया काढून लाल झेंडे फडकावत मातम करतात अर्थात दुःख व्यक्त करतात. (Iran Israel War)
लाल झेंड्यामुळे मुस्लिम राष्ट्रे पेटणार?
इराणमध्ये शिया मुसलमान जामकरण या मध्ये मशिदीवर तेव्हाच लाल झेंडा फडकावतात, जेव्हा युद्धाची घोषणा होते किंवा त्यांच्या नेत्याचा मृत्यू होतो. सध्याच्या युद्धात इराणचे प्रमुख आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला असून इराण युद्धात आहे. हाच लाल झेंडा प्रामुख्याने इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी, शत्रूंना इशारा देण्यासाठी किंवा युद्धाच्या वेळी फडकवला जातो. शिया परंपरेतला हा झेंडा बदला घेण्याचे संकेत मानला जातो. (Iran Israel War)
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर शिया मुसलमानांनी लाल झेंडे अनेक ठिकाणी फडकावले आहे. या झेंड्याच्या माध्यमातून इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेला (Iran Israel War) तर इशारा दिला आहेच आपण सोबत सुन्नी मुस्लिम राष्ट्रे सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, कुवेत, कतार यांसह किमान १० राष्ट्रांच्या विरोधात युद्धाचे बिगुलही वाजवले आहे. त्यामुळे शिया-सुन्नी मुसलमानांच्या संघर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे संकेत मिळत आहेत.
Join Our WhatsApp Community


