Maharashtra ZP Election Result : ‘दादांना मतांच्या स्वरुपात वाहिलेली आदरांजली’; सुनील तटकरेंनी व्यक्त केल्या भावना

129
Maharashtra ZP Election Result : 'दादांना मतांच्या स्वरुपात वाहिलेली आदरांजली'; सुनील तटकरेंनी व्यक्त केल्या भावना
  • प्रतिनिधी

“जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे सोमवारी हाती आलेले निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसेवेला आणि विकासाच्या राजकारणाला जनतेने दिलेली कृतज्ञतापूर्वक मानवंदना आहे,” अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या अकाली निधनानंतर झालेल्या या पहिल्या मोठ्या निवडणुकीत पक्षाने मिळवलेल्या यशानंतर तटकरे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. (Maharashtra ZP Election Result)

(हेही वाचा – Kalyan-Dombivli : कचऱ्याचा होणार सुफडा साफ; नव्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डिप क्लिनिंगला प्रारंभ)

​सुनील तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, अजितदादांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला वाहून घेतले होते. आजचा हा निकाल म्हणजे दादांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या विचारांवर जनतेची असलेली अढळ श्रद्धा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ही केवळ विजयाची आकडेवारी नसून, दादांच्या कार्याची पोहोचपावती असल्याचे त्यांनी नमूद केले. (Maharashtra ZP Election Result)

(हेही वाचा – Sindhudurg ZP Election Result : महायुतीचा गुलाल की बंडखोरांचा दणका? अपक्षांनी भाजपा-शिवसेनेला कसं रोखलं?)

​अजितदादांच्या निधनामुळे पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले असताना, या यशाने कार्यकर्त्यांना नवे बळ दिले आहे. “दादांनी सुरू केलेला विकासाचा वारसा जपत, अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प या निकालांमुळे अधिक दृढ झाला आहे,” असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. या विजयामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. (Maharashtra ZP Election Result)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.