-
कल्याण, प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आणि काही पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या झाल्या आहेत. आतापर्यंत प्रशासनातील नोकरशहांनी आपापल्या परीने कल्याण-डोंबिवलीच्या कचऱ्याचे संकलन, निर्मूलन आणि विघटनाची प्रक्रिया केली होती. मात्र यापुढे कल्याण-डोंबिवलीतून कचऱ्याचा सुफडा साफ करण्यासाठी प्रशासनाने सोमवारी नव्याने निवडून आलेल्या काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन डिप क्लिनिंगला सुरूवात केली. (Kalyan-Dombivli)
या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुयोग्य नियोजन केले आहे. सोमवारी सकाळी महापौर हर्षाली चौधरी-थविल आणि उपमहापौर राहूल दामले यांच्या हस्ते कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन दुर्गा देवीचे दर्शन घेतल्यानंतर डिप क्लिनिंगला प्रारंभ केला. या मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवलीतील सर्व प्रभाग क्षेत्रांमध्ये ९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विशेष स्वच्छता दैनंदिन स्वरूपात सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रस्तावना करून स्वच्छता मोहीम राबविणे का आवश्यक आहे व त्याचे महत्त्व काय ? या बाबत नागरीकांचा सहभाग अपेक्षित असल्याचे सांगितले. (Kalyan-Dombivli)
(हेही वाचा – Asian Shooting Championship : २५ मीटर पिस्तूल प्रकारत मनू भाकरला रौप्य पदक)
तर आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वंकष स्वच्छता ठेऊन शहर शाश्वत स्वच्छ कसे राहिल, याकरिता व मानांकन उंचावण्यासाठी नगरसेवक आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन उपमहापौर राहूल दामले यांनी केले. महापौर हर्षाली चौधरी-थविल यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात सर्वंकष विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहराचे मानांकन उंचावण्याचे आदेश उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. (Kalyan-Dombivli)
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मोहिमेच्या शुभारंभाला नगरसेवकांपैकी अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, समिना शेख, गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव, कांचन कुलकर्णी, जतिन प्रजापती, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, सहा. आयुक्त, अगस्तिन घुटे, स्वच्छता विभागातील अधिकारी, निरिक्षक आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते. (Kalyan-Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

