सैनिक शाळा ही केवळ शिक्षणाची ठिकाणे नसून ती देशप्रेम असलेले सामर्थ्यवान आणि शिस्तप्रिय नागरिक घडविणारी केंद्रे आहेत. येथील सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमुळे मुले केवळ शालेय जीवनातच नाही, तर संपूर्ण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम होतात, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख शिरीष अत्रे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या.
संस्कार आणि शिस्तीचे महत्त्व
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अत्रे पुढे म्हणाल्या की, “मनाचा कणखरपणा संकटांना सामोरं जाण्याचे धैर्य देतो. मोठ्यांचा आदर करणे, नम्रता आणि सुसंस्कृत वागणूक हे गुण सैनिक शाळेत मुलांच्या मनावर लहानपणीच बिंबवले जातात. ‘फ्रेंड्स अँड गुड मॅनर्स विल कॅरी यू व्हेअर मनी वोंट’ या उक्तीप्रमाणे पैशापेक्षा चांगली वागणूक माणसाला जीवनात मोठे करते.” (Maharashtra Military School)
(हेही वाचा Republic Day 2026 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात प्रा. स्नेहल पाठक यांच्या हस्ते ध्वजवंदन)
अपयशातून यशाचा मार्ग
थॉमस एडिसनचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटीचा मंत्र दिला. “अपयश हा यशाचा मार्ग दाखवणारा गुरु आहे. प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, तर आपल्यातील दोष शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘गिविंग अप’ (हार मानणे) हा पर्याय कधीही निवडू नका,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी इस्रोचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि सॅम माणेकशॉ यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या जडणघडणीत सैनिक शाळेच्या योगदानाचा उल्लेख केला. (Maharashtra Military School)
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि हिंदुस्थान पोस्टचे संपादक रणजित सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बँक ऑफ बडोदाच्या निवृत्त अधिकारी अलका गोडबोले, मुंबई विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख शिरीष अत्रे या प्रमुख पाहुण्या होत्या. संस्थेचे पदाधिकारी देवेंद्र गंद्रे, शाळेचे माजी मुख्याध्यापक हेमंत चोपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आणि उपस्थितांच्या उत्साहात झाली.
Join Our WhatsApp Community


