Municipal Elections : नाशिकपासून मुंबईपर्यंत शिंदेंच्या खेळीने भाजपची गणितं बिघडली

50
Municipal Elections : नाशिकपासून मुंबईपर्यंत शिंदेंच्या खेळीने भाजपची गणितं बिघडली
Municipal Elections : नाशिकपासून मुंबईपर्यंत शिंदेंच्या खेळीने भाजपची गणितं बिघडली

प्रतिनिधी

नाशिक महापालिकेत(Municipal Elections)भाजप स्वबळावर सत्तेच्या उंबरठ्यावर असतानाच, राज्याच्या राजकारणात एक वेगळाच तणाव निर्माण झाला आहे. एका बाजूला नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत, तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या महापौरपदावर अडलेली गणितं—या दोन टोकांमधून पुढील आठवडाभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या पॉवरपॉलिटिक्समुळे भाजपची कोंडी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.(Municipal Elections)

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला तब्बल ७२ जागा मिळाल्या आहेत. महापौर, उपमहापौरांसह सत्तेची सर्व प्रमुख पदे स्वबळावर मिळवण्याइतका हा आकडा पुरेसा आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजप स्वतंत्रपणे सत्ता स्थापण्याच्या तयारीत असून, या रणनीतीची सूत्रे जलसंपदा मंत्री Girish Mahajan यांच्या हाती असल्याचे मानले जाते.(Municipal Elections)

(हेही वाचा – Shivsena Hearing in Supreme Court : बाळासाहेबांच्या जयंतीला मोठा क्षण?; दिल्लीतील न्यायालयात ‘त्या’ चिन्हावर काय ठरणार… )

याच नाशिकमध्ये Shiv Sena – Eknath Shinde faction गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमताचा आकडा भाजपकडे असल्याने, शिंदे गटाला विरोधी बाकावर बसावे लागण्याची वेळ येऊ शकते. मात्र, हीच शक्यता शिंदे गटातील नगरसेवकांच्या अस्वस्थतेला कारणीभूत ठरत आहे.(Municipal Elections)

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना सत्तेत सहभागाची आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकांनी पक्षात प्रवेश केला. आता सत्ता दूर गेल्यास या नगरसेवकांची राजकीय कोंडी होण्याची भीती वाढली आहे. ही अस्वस्थता लक्षात घेऊन स्थानिक नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर सत्तेत सहभागी होण्याची मागणी सुरू केली आहे.(Municipal Elections)

दुसरीकडे, मुंबई महापालिकेतील महापौरपदाची लढत भाजपसाठी निर्णायक ठरत आहे. येथे भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापणं अवघड असल्याचे वास्तव आहे. हीच कमकुवत जागा ओळखून शिंदे गटाने दबावतंत्र अवलंबल्याचे चित्र आहे. मुंबईत साथ द्यायची, तर नाशिक, पुणे आणि इतर महापालिकांमध्ये सत्तेत वाटा द्या—असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Municipal Elections)

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही शिंदे गट काही पदांवर आग्रह धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वबळावर सत्ता असतानाही भाजपला भागीदारीचा विचार करावा लागतोय, हेच या राजकीय खेळीचं वैशिष्ट्य ठरत आहे. “नाक दाबलं की तोंड उघडतं” अशीच परिस्थिती सध्या भाजपसमोर उभी असल्याचे बोलले जात आहे.(Municipal Elections)

दरम्यान, बुधवारी नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी काढण्यात येणाऱ्या कायदेशीर सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज गटनोंदणी आणि आघाड्यांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, त्यावरच महापौर व उपमहापौर पदांचे राजकीय गणित ठरणार आहे. या प्रक्रियेत शिंदे गट वाटा मागून भाजपची डोकेदुखी वाढवेल का, याकडे राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.(Municipal Elections)

स्वबळावर सत्ता असूनही भागीदाराची गरज, आणि भागीदाराकडूनच दबाव—या विरोधाभासात अडकलेली भाजपची अवस्था आणि त्यावर शिंदे गटाने उभारलेली राजकीय खेळी, पुढील काही दिवसांत महायुतीतील अंतर्गत संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो, याचे संकेत देत आहे.(Municipal Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.