Mumbai Police यांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातून हस्तगत केले २ कोटींचे १६५० चोरीचे मोबाईल

42
Mobile : चोरांच्या नेटवर्कवर पोलिसांचा जॅमर
Mobile : चोरांच्या नेटवर्कवर पोलिसांचा जॅमर

मुंबई:

मुंबईतून हरविलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी(Mumbai Police)उत्तर प्रदेशात राबवलेली विशेष मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी उत्तर प्रदेशातील १९ जिल्ह्यांमधून तब्बल १,६५० मोबाईल संच हस्तगत केले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत २ कोटी रुपये इतकी आहे.(Mumbai Police)

(हेही वाचा – India – US Trade : नरेंद्र मोदींनी खरंच ट्रम्प यांना दूरध्वनी केला नाही का? वाणिज्य सचिवांनी फेटाळला अमेरिकेचा दावा )

मुंबई पोलीस आयुक्तांच्या मान्यतेने प्रत्येक परिमंडळात स्थापन केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची १३ पथके उत्तर प्रदेशात पाठवण्यात आली होती. या पथकांनी उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून हे मोबाईल शोधून काढले. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३३,५१४ चोरीचे किंवा हरविलेले मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत.(Mumbai Police)

ही कामगिरी पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिमंडळीय पोलीस उप आयुक्त आणि CEIR नोडल अधिकाऱ्यांनी फत्ते केली आहे.(Mumbai Police)

नागरिकांना आवाहन:

मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत मुंबई पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:

* मोबाईल हरवल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
* गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर मोबाईल तातडीने ब्लॉक करावा.
* अनोळखी व्यक्तीकडून जुने मोबाईल खरेदी करणे टाळावे.
* जुना मोबाईल विकत घेताना तो चोरीचा नाही ना, याची खात्री ‘Sanchar Sathi’ ॲप किंवा १४४२२ या क्रमांकावर IMEI नंबर पाठवून करावी.(Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.