Bangladesh : माजी लष्करी अधिकारी निघाला फुटीरतावादी; भारतावर विखारी टीका करत म्हणाला…

Bangladesh :      बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी(बीएनपी)चा नेता खालिदा झिया माजी लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसून येत आहे.(Bangladesh) माजी लष्करी अधिकाऱ्याने भारताविरोधात गरळ ओकली आहे.

121
Retired military officer making a statement against India.
A retired military officer speaks out against India.

Bangladesh :      बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी(बीएनपी)चा नेता खालिदा झिया माजी लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसून येत आहे.(Bangladesh) माजी लष्करी अधिकाऱ्याने भारताविरोधात गरळ ओकली आहे. कर्नल अब्दुल हक म्हणाले, भारतातील सात ईशान्येकडील राज्ये वेगळी होईपर्यंत बांगलादेश सुरक्षित राहणार नाही. कर्नलच्या विखारी भाषेला स्थानिक नेत्याने समर्थन दिल्याचे समोर आले आहे.(Bangladesh)

(हेही वाचा Bharat Mandapam : दिल्लीत भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन )

दरम्यान, बीएनपी नेता खालिदा झिया भारताचे विघटन करण्याचे समर्थन करत आहेत. बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर, भारतविरोधी वक्तव्ये वाढत्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत. अलिकडेच, बांगलादेशचे निवृत्त लष्करी अधिकारी व बीएनपी नेते कर्नल अब्दुल हक यांनी उघडपणे भारताच्या ईशान्येकडील राज्यांना वेगळे करण्याचे आवाहन केले.(Bangladesh)

(हेही वाचा Parliament Session : सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही; इंडिगो सेवा व्यत्ययासंदर्भात केंद्रीय मंत्री काय म्हणाले? )

एका कार्यक्रमात बोलताना हक म्हणाले, बांगलादेशने आपल्या तरुणांना लष्करी प्रशिक्षण द्यावे जेणेकरून ते भारताचा सामना करू शकतील. ते म्हणाले, “जोपर्यंत आपण भारताची सात ईशान्येकडील राज्ये वेगळी करत नाही व त्यांना सात नवीन देशांमध्ये बदलत नाही तोपर्यंत बांगलादेश सुरक्षित राहणार नाही.” भारताची सात ईशान्येकडील राज्ये वेगळी होईपर्यंत बांगलादेश सुरक्षित राहणार नाही, असा पोकळ दावा देखील त्यांनी केला आहे.(Bangladesh)

 

माजी लष्करी अधिकाऱ्याने गरळ ओकली

बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याने पोकळ दावा करताना म्हटले की, ईशान्य भारतातील अनेक नागरिक भारतापासून वेगळे होऊ इच्छितात. परंतु, बांगलादेश आतापर्यंत त्यांना मदत करू शकलेला नाही. ते म्हणाले, “जर भारत आपल्या देशात हस्तक्षेप करू शकतो, तर आपण तेथे सात नवीन देश का निर्माण करू शकत नाही?”, अशी वल्गनादेखील त्यांनी केली. कर्नल हक म्हणाले, “नागरिक म्हणतात की, तुम्ही तुमचे शेजारी बदलू शकत नाही. मी हो म्हणतो, आम्ही आमचे शेजारी बदलू शकत नाही, पण आम्ही नवीन शेजारी निर्माण करू शकतो. नवीन शेजारी निर्माण करून, आम्ही बांगलादेशला एक मजबूत, स्वतंत्र राष्ट्र बनवू शकू.”, असे म्हणत खोडसाळपणा करण्याचे धाडस त्यांनी दाखविले.(Bangladesh)

भारतावर धादांत खोटे आरोप

हक पुढे म्हणाले की, भारत बांगलादेशच्या राजकारणात, प्रशासनात व लष्करात हस्तक्षेप करत आहे. त्यांनी सत्ताधारी अवामी लीगवर भारत समर्थक असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, भारताचे लक्ष चितगाव पर्वतीय प्रदेशावर असून “चिकन नेक” (ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा २२ किलोमीटरचा प्रदेश) फूट पाडून हा प्रदेश काबीज करू इच्छित आहे.(Bangladesh)

त्यांनी असा दावा केला की जर त्यांनी ‘चिकन नेक’ ताब्यात घेतला तर त्यांना उर्वरित प्रदेश काबीज करणे सोपे होईल. जमात नेत्याने लोकांना आवाहन केले की भारताच्या कथित योजना रोखण्यासाठी देशाने जुलैच्या निषेधांप्रमाणे एकत्र यावे. कर्नल हक २०२३ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. त्यांना जमात-ए-इस्लामीचे कट्टर समर्थक मानले जाते. ते खालिदा झिया यांच्या पक्षाचे, बीएनपीचे सक्रिय नेते आहेत. बीएनपी वन जमात या दोन्ही पक्षांना भारतविरोधी भूमिका असल्याचे पाहिले जाते.(Bangladesh)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.