Maharashtra Winter Session : संसदेत चर्चा सुरू असतानाच विधिमंडळात ‘वंदे मातरम’चे संपूर्ण गायन

160
Maharashtra Assembly building during winter session.
Nagpur Winter Session : 'दीड हजारात विधीमंडळात प्रवेश ?'; सभागृहात शिवसेना उबाठा आमदाराचा गंभीर आरोप
  • प्रतिनिधी

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आणि स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ठरलेल्या ‘वंदे मातरम’ या गीतास ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले. संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीत म्हणण्याची ही पहिलीच वेळ होती. (Maharashtra Winter Session)

दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगानाने आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने सुरूवात झाली. (Maharashtra Winter Session)

विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत दिवंगत सदस्यांस श्रद्धांजली वाहण्यात आली.

विधानसभेत पंधराव्या विधानसभेचे सदस्य राहिलेल्या शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोंसा, राजीव देशमुख, निर्मला ठोकळ यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव  मंजूर करण्यात आला. दरम्यान, विधान परिषदेतही निर्मला ठोकळ आणि  प्रकाश देवळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

(हेही वाचा – IndiGo flight : इंडिगोच्या रद्द झालेल्या फ्लाइटसाठी रिफंड कसा घ्याल? ‘इथे’ वाचा…)

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची नावे सभागृहात जाहीर केली. (Maharashtra Winter Session)

विधानसभा तालिका अध्यक्षपदी भाजपाचे चैनसुख संचेती, समीर कुणावार, शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरोज अहिरे, शिवसेना उबाठाचे डॉ. राहुल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर, काँग्रेसचे रामदास मसराम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ॲड. नार्वेकर यांनी घोषित केले. (Maharashtra Winter Session)

दरम्यान, विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनीही तालिका सभापतींच्या नियुक्ती जाहीर केली. तालिका सभापती म्हणून अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.