
-
प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरचे राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे. विधिमंडळातील दोन्ही सभागृहांत गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त पडल्याने आधीच असंतोष उसळलेला असताना आता एका नव्या नावाने खळबळ उडाली आहे. (Maharashtra Winter Session)
महाविकास आघाडीकडून गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांचे नाव पुढे केले जात होते. अनुभवी असल्याने त्यांचेच नाव अंतिम ठरेल, अशी चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र अचानक समीकरण बदलल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Winter Session)
(हेही वाचा – Maharashtra Winter Session : संसदेत चर्चा सुरू असतानाच विधिमंडळात ‘वंदे मातरम’चे संपूर्ण गायन)
उद्धव ठाकरे यांनी आता आदित्य ठाकरे यांच्या नावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट शब्द टाकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. (Maharashtra Winter Session)
आदित्य ठाकरे हे सध्या गटनेते असून त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद दिल्यास त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि मविआच्या प्रचारात ते अधिक आक्रमकपणे झुंज देऊ शकतील, असा पक्षातील मतप्रवाह आहे. (Maharashtra Winter Session)
(हेही वाचा – Naxalite : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड झोन झाले नक्षलमुक्त; १२ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण)
चहापान बहिष्काराने तापली हवा
वर्षभर विरोधी पक्षनेता नसल्याच्या निषेधार्थ मविआने अधिवेशनाच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. “इतिहासात पहिल्यांदाच इतका दीर्घ काळ हे संवैधानिक पद रिक्त ठेवण्यात आले,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या निर्णयाचा अधिकार अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारित आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल.” (Maharashtra Winter Session)
पद रिक्त का ? आकडेवारी सांगते खरी कहाणी
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्यासाठी २९ आमदारांची गरज असते.
मात्र सध्या –
- शिवसेना उबाठा : २०
- काँग्रेस : १६
- राष्ट्रवादी (शरद पवार) : १०
कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे आवश्यक १० टक्के संख्याबळ नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमानुसार हे पद रिक्त ठेवावे लागले आहे. (Maharashtra Winter Session)
(हेही वाचा – Indigo Crisis in Parliament : इंडिगो प्रकरण सर्व विमान कंपन्यांसाठी एक धडा; सरकार काय कारवाई करणार?)
आता नजर उद्धव-फडणवीस भेटीवर !
भास्कर जाधव यांचे नाव मागे पडत असताना आदित्य ठाकरे यांच्या नावाची अचानक लागलेली लॉटरी विरोधी पक्षाच्या समीकरणात नवे वळण आणणार का ? मुख्यमंत्री फडणवीस-ठाकरे भेटीची घोषणा झाली की विरोधी पक्षनेतेपदाचा ‘खरा’ चेहरा समोर येईल… आणि पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या अधिकच रोचक ठरणार, हे नक्की ! (Maharashtra Winter Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
