
- ऋजुता लुकतुके
भारतीय संघातील दोन ज्येष्ठ क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली(Virat Kohli)सध्या कसोटी आणि टी-२० प्रकारातून निवृत्त झाले असले तरी एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोघंही एकदिवसीय मालिकेत खेळले. भारताने ही मालिका १-२ ने गमावली. पण, मालिकेदरम्यान विराट, रोहितचा फॉर्म, कामगिरी यांची चांगलीच चर्चा रंगली. आता आफ्रिकन संघाविरुद्धही दोघं पुन्हा एकदा एकदिवसीय मालिका खेळताना दिसतील. पण, त्यापूर्वी बीसीसीआयने दोघांनाही एक इशारा दिला आहे.(Virat Kohli)
(हेही वाचा – अभयारण्यांच्या १ किलोमीटरच्या परिसरामध्ये खाणकामावर बंदी; Supreme Court चा मोठा निर्णय)
भारतीय संघात खेळायचं असेल तर दोघांनाही देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिलं पाहिजे, असं बीसीसीआय आणि संघ प्रशासनाने दोघांना सांगितल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी टी-२० आणि कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली असल्याने, तंदुरुस्त राहण्यासाठी दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्माने विजय हजारे करंडकासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे उपलब्ध असल्याचं निश्चित केलं आहे, परंतु विराट कोहली देशांतर्गत क्रिकेट खेळणार की नाही अद्याप स्पष्ट नाही.(Virat Kohli)
रोहित आणि विराट दोघांनीही अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेतला होता. रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले. सलग दोन एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७४ धावा करून नाबाद राहिला. रोहित शर्माने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक २०२ धावा केल्या, ज्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.(Virat Kohli)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून रंगणार आहे. पहिला एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा ३ डिसेंबर रोजी आणि तिसरा ६ डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. पण, रोहित आणि विराटची निवड पक्की आहे.(Virat Kohli)
हेही पहा –

