
-
प्रतिनिधी
मुंबईतील साकीनाका येथे सोमवारी रात्री जेवण आणण्यावरून झालेल्या वादात चार जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मंगळवारी सकाळी ४ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या चौघांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा – विरोधकांना धक्का; हायकोर्टाने Voter List संदर्भातील चारही याचिका फेटाळल्या)
जावेद अहमद आशिकअली खान (४३) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. कुर्ला पश्चिम जरीमरी येथील एकता सोसायटी या ठिकाणी राहणारे मोहम्मद सहबाज सज्जाद हुसेन खान (२१), जमाल हुसेन मोहम्मद हुसेन खान (४२), सज्जाद हुसेन मोहम्मद हुसेन खान (४२) आणि मोहम्मद आरिफ मोहम्मद हुसेन खान (३२) यांच्यासोबत मृत जावेद हा राहण्यास होता. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चौघांनी जावेद अहमद याला हॉटेल मधून जेवणाचे पार्सल घेऊन येण्यास सांगितले, परंतु जावेदने मी जेवणार नाही, त्यामुळे पार्सल तुम्ही घेऊन या मी जाणार नाही असे सांगितले. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Bihar Election : ‘विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी…’; राहुल गांधी ते लालू परिवार, अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल)
दरम्यान चौघांनी तू जेवणार नसला तरी पार्सल तूच घेऊन ये असे जावेदला चौघांनी सांगितले, यावरून त्यांच्यात वाद झाला आणि चौघांनी मिळून जावेदला लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावेदने जखमी अवस्थेत जवळच राहणारे नातेवाईक अब्दुल कादिर खान यांना फोन करून घडलेली घटना सांगितली. नातेवाईक अब्दुल कादिर हा एकता सोसायटीत येऊन मारहाणी बाबत चौघांना जाब विचारला असता चौघांनी त्याला देखील मारण्याची धमकी दिली. अब्दुल कादिर याने जखमी जावेदला रात्री उशिरा कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौघांचा शोध सुरू केला आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
