रस्ते अपघातात (Accident News) वाढ झाली असून रोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. यात डंपर भरधाव वेगाने नेली जात असल्याने यातून अनेक अपघात झाल्याचे समोर येत आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. (Accident News)
हेही वाचा-world climate change : प्रदुषण करण्यात चीन अव्वल! भारत आणि अमेरिका कोणत्या स्थानावर?
हेडावे नाका परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका आयशर ट्रकने मोटरसायकलला धडक देत तिघांना चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात अमळनेरच्या हेडावे रस्त्यावर रात्री उशिरा घडला. (Accident News)
हेही वाचा- Viral Video : व्हायरल डान्स व्हिडिओवरून खळबळ! खरं सत्य आलं समोर…
एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीररित्या जखमी झाले. या दुर्घटनेत एकरुखी येथील रहिवासी असलेले विश्वनाथ हिम्मत भिल्ल आणि ज्योत्स्नाबाई विश्वनाथ भिल्ल यांचा जागीच मृत्यू झाला. (Accident News)
हेही वाचा- Murder : बीड हादरलं! गजबजलेल्या भागात पत्रकाराच्या मुलाचा खून
या अपघातात बाळू साहेबराव पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तिघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

