Rahul Gandhi यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा; ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने याचिका फेटाळली

Rahul Gandhi :      शीख पगडीसंदर्भातील टिप्पणी वादाच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

182

Rahul Gandhi :      शीख पगडीसंदर्भातील टिप्पणी वादाच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची याचिका फेटाळण्यात आल्याने आता वाराणसी खासदार/आमदार न्यायालयात पुनर्विचार याचिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.(Rahul Gandhi)

(हेही वाचा Lands For Jobs Case : निवडणुकीआधीच लालूंच्या कुटुंबियांना धक्का बसणार?; लँड फॉर जॉब्स प्रकरणी निकाल लागणार )

दरम्यान, शीख पगडीवरील टिप्पणी वादात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गेल्या वर्षी शीख समुदायाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध पुनर्विचार याचिका स्वीकारणाऱ्या वाराणसी विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत अलाहाबाद उच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा धक्का दिला आहे.(Rahul Gandhi)

(हेही वाचा संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान: MiG-21 Retirement; नंतरही भारत रशियाबद्दल केले मोठे विधान )

काँग्रेस नेत्याची याचिका फेटाळण्यात आल्यामुळे आता वाराणसी खासदार/आमदार न्यायालयात पुनर्विचार याचिका पुढे चालण्याचा मार्ग मोकळा होईल. २१ जुलै २०२५ रोजी, वाराणसीच्या खासदार/आमदार न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धची पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.(Rahul Gandhi)

राहुल गांधी काय म्हणाले होते?

“भारतातली लढाई ही शीखांना पगडी घालण्याची परवानगी द्यायची की नाही… शीखांना करा घालण्याची परवानगी द्यायची की गुरुद्वारात जाण्याची परवानगी द्यायची, याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. हा लढा फक्त शिखांसाठी नाही तर सर्व धर्मांसाठी आहे,” असे राहुल गांधी यांनी २०२४ मध्ये व्हर्जिनिया येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.(Rahul Gandhi)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.