-
प्रतिनिधी
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. गाण्या-बजाच्या तालावर थिरकणाऱ्या व्यक्तीचा संबंध थेट जिल्हाधिकारी पदाशी जोडला गेल्याने खळबळ माजली होती. लोकांनी संताप व्यक्त केला, तर काहींनी प्रशासनावर बेफिकीरपणाचा ठपका ठेवला. मात्र हा व्हिडिओ खरंच तसाच आहे का? की त्यामागे वेगळं सत्य दडलंय?
(हेही वाचा – Viral Video : शेतकरी संकटात, पण अधिकारी मजेत ? धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)
जिल्ह्यातील शेतकरी संकट, पिकांचं नुकसान आणि प्रशासनावरील जबाबदारी या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ अधिकच गाजत होता. सोशल मीडियावर ट्रोल्स, टीका आणि आरोपांची मालिका सुरु झाली. पण खरी व्यक्ती नेमकी कोण? जिल्हाधिकारी खरंच कार्यक्रमात थिरकले होते की सोशल मीडियानं दृश्यांचा चुकीचा अर्थ काढला? या प्रश्नांनी वातावरण तापवलं.
(हेही वाचा – Murder : बीड हादरलं! गजबजलेल्या भागात पत्रकाराच्या मुलाचा खून)
याच दरम्यान, एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, व्हिडिओमध्ये काळ्या शर्टमध्ये वृद्ध महिलेजवळ उभे असलेले म्हणजे जिल्हाधिकारी आहेत आणि ते फक्त टाळ्या वाजवत होते. पांढऱ्या शर्टमध्ये जो व्यक्ती नाचताना दिसतो, तो जिल्हाधिकारी नाही. म्हणजेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या चर्चांचा मोठा गैरसमज झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

