इंग्लंडमध्ये भारतीय संघाला Virat Kohli ची उणीव भासली का?

Virat Kohli : संघातील एका खेळाडूने यावर काय म्हटलं पाहा.

169
इंग्लंडमध्ये भारतीय संघाला Virat Kohli ची उणीव भासली का?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा हे दिग्गज फलंदाज भारतीय संघातून निवृत्त झाले असताना भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेत इंग्लंडच्या तुलनेत जास्त सत्रांवर वर्चस्व गाजवलं. या कामगिरीचा एक शिल्पकार होता आकाशदीप. त्याने ३ कसोटींत १३ बळी मिळवले. भारताने विजय मिळवलेल्या एजबॅस्टन कसोटीत तर त्याने १० गडी बाद करण्याची किमया केली. मध्यंतरी एका मुलाखतीत त्याला एक प्रश्न विचारण्यात आला? या भारतीय संघाला विराट कोहलीची उणीव भासली का?

आकाशदीपने या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. पण, संघातील एक वातावरण सूचित केलं. ‘हा एक सांघिक खेळ आहे. आणि इथं संघात ११ खेळाडू आहेत. उद्या कदाचित मी या संघाचा भाग असणार नाही. पण, संघ तरीही चांगली कामगिरी करतच राहील. म्हणजेच संघ एका व्यक्तीचा बनलेला नसतो. तर तो ११ खेळाडूंचा बनलेला असतो,’ असं आकाशदीप आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला. (Virat Kohli)

(हेही वाचा – US – China Trade : ट्रम्प यांनी चीनवरील आयात शुल्कवाढ ९० दिवस पुढे का ढकलली?)

भारतीय संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांघिक भावनेलाच वेळोवेळी महत्त्व दिलं आहे. आताही तो विजयाचं श्रेय संघातील सर्व खेळाडूंमध्ये वाटण्याबद्दल जागरुक आहे. आकाशदीपही तीच भूमिका मांडताना दिसतो आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आकाशदीपने विराट कोहलीसह ड्रेसिंग रुममध्ये वेळ घालवला आहे. त्यावेळी विराटने (Virat Kohli) त्याला भेट म्हणून दिलेल्या बॅटचा व्हिडिओ त्याने शेअर केला होता.

यंदा आयपीएल स्पर्धा ऐन रंगात आली असताना रोहित शर्मा आणि मागोमाग विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. विराटने १२३ कसोटींत ९,२३० धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर ३० शतकं आहेत. पण, १०,००० धावांची वाट न पाहता त्याने निवृत्ती जाहीर केली. रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीतही भारताने इंग्लंडमध्ये चांगला खेळ केला. शुभमन गिलने सर्वाधिक ७५४ धावा केल्या. तर रवींद्र जडेजा, के. एल. राहुल आणि रऋषभ पंत यांनीही पाचशेच्या आसपास धावा केल्या. नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्थित्यंतरातून जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.