Dahi Handi 2025 : राज्य सरकारचा मोठा निर्णय! १.५० लाख गोविंदांना विम्याचं कवच

201
Dahi Handi 2025 : मुंबईत ७५ गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
Dahi Handi 2025 : मुंबईत ७५ गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

दहीहंडी २०२५ सणाच्या तोंडावर राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या ठाम मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हा निर्णय गोविंदांच्या सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. (Dahi Handi 2025)

गेल्या काही वर्षांत दहीहंडीच्या (Dahi Handi 2025) उत्सवात होणाऱ्या अपघातांमुळे अनेक गोविंदांना गंभीर दुखापती झाल्या. काहीजण कायमचे अपंग तर काहींना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर यंदा “दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड” मार्फत प्रत्येक गोविंदाला विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng, 5th Test : इंग्लंड दौऱ्यावर संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूचे वडील बीसीसीआयबद्दल काय म्हणाले?)

सरकारचा तातडीने निर्णय, यंदा कुणीही वंचित राहणार नाही!

गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा मिळाला होता, मात्र अनेक मंडळांतील गोविंदा वंचित राहिले. यावर्षी ही त्रुटी दूर करत विमा रकमेची मर्यादा वाढवण्यात आली असून रु. १.१२ कोटींचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत संबंधित अधिकार्‍यांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.

सरनाईक पितापुत्रांचा दमदार पाठपुरावा

या विमा योजनेसाठी सरनाईक पितापुत्र गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या सामाजिक भान आणि राजकीय वजनाला यश मिळाले. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो गोविंद मंडळांत आनंदाचे वातावरण आहे.

(हेही वाचा – Anil Ambani यांच्या अडचणी वाढल्या! चौकशीसाठी दिल्लीत हजर राहावे लागणार)

उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही योगदान

या विमा योजनेस उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही संपूर्ण पाठिंबा दिला. त्याबद्दल युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

दहीहंडी सणास आता सुरक्षिततेचं कवच

यंदाचा दहीहंडी (Dahi Handi 2025) उत्सव फक्त जल्लोष नव्हे तर सुरक्षिततेचाही सण ठरणार आहे. विमा संरक्षणामुळे गोविंदांवरचा धोका कमी होणार असून, ही योजना भविष्यातील उदाहरण ठरेल, अशी प्रतिक्रिया गोविंदा मंडळांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.