रोहित पवार ठरले ‘गेमचेंजर’; कोकाटेंचे मंत्रिपद वाचले तरी Ajit Pawar यांचा डाव फसला?

224
रोहित पवार ठरले 'गेमचेंजर'; कोकाटेंचे मंत्रिपद वाचले तरी Ajit Pawar यांचा डाव फसला?
  • प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात एक मोठा उलथापालथीचा क्षण ठरलेला खात्याबदल – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांचा दबाव असल्याची खात्रीलायक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अद्याप मंत्रिपद कायम ठेवत केवळ खाते बदलण्यात आले असले तरी, या निर्णयाच्या मुळाशी नवखे वाटणारे, पण आक्रमक आणि परिणामकारक नेतृत्व करणारे रोहित पवार असल्याचे बोलले जात आहे. कोकाटेंवर झालेली ही अर्धवट कारवाई म्हणजेच ‘न सजा न इनाम’, अशी व्याख्या केली जात आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng, 5th Test : इंग्लंड दौऱ्यावर संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूचे वडील बीसीसीआयबद्दल काय म्हणाले?)

कोकाटेंच्या खात्यावर ‘पवार’फुल दबाव!

रोहित पवार यांनी विधानसभेत कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राज्यभरातील विविध कृषी संघटनांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही दबाव वाढला होता. मात्र अजित पवारांनी कोकाटेंचा संपूर्ण पत्ता कट करण्याऐवजी केवळ कृषी खाते काढण्याचा निर्णय घेतला.

रोहित पवार यांचे वाढते पक्षीय वजन

केवळ कोकाटेंच्या खात्याबदलापुरते नव्हे, तर रोहित पवार यांनी पक्षाच्या अंतर्गत राजकारणातही मोठा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष सर्वांनाच ज्ञात आहे. या संघर्षात जयंत पाटील यांना बाजूला सारून रोहित पवार यांनी शशिकांत शिंदे यांना नवे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात निर्णायक भूमिका बजावली, असा देखील दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षात रोहित पवार यांचे सक्त नेतृत्व आणि निर्णयक्षमतेचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

(हेही वाचा – Fake Police Action : घरात घुसून रोख रक्कम आणि दागिने उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत)

अजित पवारांचा प्रयत्न अपुरा ठरला?

उपमुख्यमंत्री आणि रोहित पवार यांचे काका असलेले अजित पवार (Ajit Pawar) या खात्याबदलाचे श्रेय रोहित पवार यांना जाऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचीही माहिती समोर आली आहे. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना फारसा यश आले नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कोकाटेंच्या मंत्रिपदाची पूर्ण सुटका टाळून सामंजस्याचा मार्ग स्वीकारण्यात आला असला, तरी राजकीय वर्तुळात हा विजय रोहित पवारांचाच मानला जातो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.