UBT group survey : “एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला!” – शिवसेनेच्या सर्व्हेतून काय आले समोर

मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे.

228
UBT group survey : “एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला!” – शिवसेनेच्या सर्व्हेतून काय आले समोर
UBT group survey : “एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला!” – शिवसेनेच्या सर्व्हेतून काय आले समोर

मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजावं! (UBT group survey)

सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष:

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती झाली तर 100+ जागा सहज मिळू शकतील, असा या सर्व्हेचा अंदाज आहे.तर मनसेला स्वतंत्रपणे लढल्यास 25 जागा मिळण्याची शक्यता, परंतु युतीत मनसेला अधिक फायदा होणार.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्व्हेवरून तयार केलेल्या आकडेवारीनुसार, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप, शिंदे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित पूर्णपणे कोलमडू शकते.(UBT group survey)

(हेही वाचा – टॅरिफ टू अॅप प्रक्रियेमुळे राज्यातील औद्योगिक वीजदर होणार स्वस्त; CM Devendra Fadnavis यांची माहिती)

याआधी काय घडलं होतं ?

2012 मध्ये एकसंध शिवसेनेला 75, भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये शिवसेना व भाजप वेगळे लढले, तेव्हा शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या. मनसे केवळ सात जागांवर सीमित राहिली होती.

मराठी मते आणि ठाकरे ब्रँडची ताकद:

गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहीम, वांद्रे, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग या मराठी बहुल भागात ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा फरक पडणार आहे. युती न झाल्यास राज ठाकरे यांच्या मनसेला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागेल, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.(UBT group survey)

(हेही वाचा – खासगी शिकवणीबाबत अधिनियम तयार करणार; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची माहिती)

भाजपची रणनीती स्पष्ट:

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. यामुळे भाजप-शिंदे युतीने महापालिका ताब्यात घेण्याचा विश्वास बाळगला आहे.

राजकीय भविष्य:

सर्व्हेचा निष्कर्ष स्पष्ट सांगतो – “ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पुन्हा त्यांच्याच ताब्यात येईल. पण जर ते वेगळे राहिले तर भाजपचा दणका अटळ आहे.” त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.