
-
सचिन धानजी, मुंबई
महानगरपालिकेच्या परेल येथील राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयात रुग्ण आणि त्यांचे नातेवाई तसेच रुग्णालय परिरसराच्या सुरक्षिततेकरिता रुग्णालयीन आवारामध्ये आता अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयात विविध भागांमध्ये १४५ कॅमेरे बसवलेले आहेत. परंतु यातील काही भागांचे चित्रण यातून होत नसल्याने या डार्क स्पॉटचाही परिसर कॅमेराखाली आणण्यासाठी अतिरिक्त १११ नवीन कॅमरे बसवले जाणार आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयाचा परिसर ३६० अंशात कॅमेराखाली येणार असून यामुळे कॅमराअभावी होणारी विविध भागांतील चोरी आणि इतर गैरप्रकार हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टाळता येणे शक्य होणार आहे. (KEM Hospital)
(हेही वाचा – Hawkers Protest : फेरीवाल्यांचा मंगळवारी मोर्चा; सोमवारी व्यवसाय बंद ठेवून केले आंदोलन)
मुंबई महापालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालय हे प्रमुख रुग्णालयापैंकी एक असून या रुग्णालयात मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्याप्रमाणात रुग्ण दाखल होत असतात. या रुग्णालयात १८०० खाटा आहे असून दवर्षी कोट्यवधी रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच वर्षाला लाखो आंतररुग्ण उपचार घेत असतात. या रुग्णालयात सर्वसामान्यांसह दैनंदिन रुग्णांची वर्दळ लक्षणीय आहे. अशा भागात हेतूपुरस्सररित्या किंवा निष्काळजीपणामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या रुग्णालयात सध्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सद्यस्थितीत झायकॉम कंपनीचे १४३ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सिमेंस या कंपनीने प्रायोगिक तत्वावर रुग्णालयास प्रदान केलेले असे एकूण १४५ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. परंतु रुग्णालय व रुग्णालयीन परिसरातील अनेक भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली येत नसल्यामुळे तसेच रुग्णालय परिसरातील असंख्य लोकांची वर्दळ लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सद्यःस्थित अस्तित्वात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (KEM Hospital)
(हेही वाचा – Brahmos Missile System : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मध्य पूर्व ते लॅटिन अमेरिकेपर्यंत ब्रह्मोसची मागणी, वाचा संपूर्ण बातमी)
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता तसेच रुग्णालयाचे सहायक सुरक्षा अधिकारी प्रमुख अभियंता (यांत्रिक व विद्युत विभाग) यांना पत्र सादर करून एकूण २३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रस्तावांपैकी १०१ सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णालयीन परिसरातील पोलवर बसवून कार्यान्वित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यानुसार यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने अतिरिक्त कॅमेरा बसण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या अंतर्गत १११ कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यामुळे सर्वच परिसर आणि कानाकोपरा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या जे ब्लॅक स्पॉट आहेत याचा आधार घेवून सामानाची चोरी तसेच गैर प्रकार घडण्याची ही संभाव्य भीती असते, तो प्रकार भविष्यात टाळता येईल, असेही अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. हे कॅमेरे बसवण्यासाठी पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी डी टेक मेडिलाईन वर्क्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (KEM Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
