-
प्रतिनिधी
राज्यातील सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विकास, जल जीवन मिशन, औद्योगिक विकास आणि भरती प्रक्रिया यावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शुक्रवारी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी सादर केलेल्या २६० प्रस्तावांवर बोलताना, राज्य सरकारची संवेदनशीलता हरवली असल्याचा आरोप केला. दानवे म्हणाले की, “सार्वजनिक आरोग्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. आदिवासी विभागाकडे सरकार फक्त मतदार म्हणून पाहतं. योजना जाहीर केल्या जातात, पण अंमलबजावणी आणि निधी मिळत नाही.”
(हेही वाचा – Coimbatore Blast मधील मुख्य आरोपी ‘सादिक राजा’ २९ वर्षांनी अटकेत!)
आदिवासी बालकांचे मृत्यू आणि कुपोषणावर प्रश्न
- राज्यातील आदिवासी बालकांचा मृत्यू ११,०४२ झाल्याचे त्यांनी सांगितले.
- नंदुरबारमधील कुपोषणाची परिस्थिती गंभीर असून गर्भपात आणि माता मृत्यू दरही मोठा असल्याचे निदर्शनास आणले.
- “एक महिला रस्त्यावर अडीच तास प्रसूती वेदना सहन करत होती, पण १०८ रुग्णवाहिका वेळेवर आली नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य विभागावर घणाघात
- “अनेक रुग्णालये उभी आहेत, पण कर्मचारी नाहीत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार नाकारले जात आहेत. ५५० घटनांमध्ये रुग्णांना नाकारले गेले, यातून सामान्यांचे हाल होत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
- दानवे (Ambadas Danve) यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली.
जल जीवन मिशनवर गंभीर आरोप
- राज्यातील ९९ लाख घरांना नळजोडणी मिळालेली नाही आणि १८ हजार कोटींचा निधी बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
- “३० हजार कोटींचा प्रकल्प वाया जाऊ शकतो,” असा इशाराही दिला.
(हेही वाचा – भक्ती बरोबर शक्ती जागरणाची गरज; प्राध्यापक Shyam Deshpande यांचे विधान )
औद्योगिक प्रकल्प आणि MIDC समस्यांवर लक्ष वेधले
- “MIDC कर्जाच्या बोझ्याखाली दबली आहे. नवीन प्लॉट्स विकले जात नाहीत. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत १०५ कोटींचा भूखंड चुकीच्या पद्धतीने दिला,” असा आरोप करत त्यांनी तपासाची मागणी केली.
- डोंबिवली MIDC स्फोटाच्या घटनेवरून औद्योगिक सुरक्षा विभागावरही ताशेरे ओढले.
MPSC भरती प्रक्रियेवर टीका
- “MPSC उमेदवार दुष्ट चक्रात अडकले आहेत. फेरतपासणी आणि नियुक्त्या रखडल्या आहेत. महावितरण विभागही भरती करत नाही,” अशी गंभीर टीका त्यांनी केली.
दानवे (Ambadas Danve) यांच्या या जोरदार भाषणाने विधान परिषदेत खळबळ उडाली. राज्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर संवेदनशीलतेच्या अभावाचा आरोप केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

