
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचा मसुदा २९ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२५ या अंतिम प्रभाग पुनर्रचनेचा प्रस्ताव प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. पण आता त्यात बदल करून ही तारीख ०३ ते ०६ ऑक्टोबर करण्यात आली आहे. मात्र, ही मुदत केवळ इतर महापालिकांमध्ये गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने त्यासाठी वेळ वाढवण्यात देण्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने सोमवारपर्यंत स्थळ पाहणीपर्यंतची कामे पूर्ण केली असल्याची माहिती मिळत आहे. (Local Body Election)
(हेही वाचा – चौथ्या महिला धोरण २०२४ च्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करणार; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही)
राज्यातील सर्व वर्गातही महापालिका, नगरपालिका तसेच मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रभाग पुनर्रचना बाबत राज्याच्या नगरविकास खात्याच्या वतीने परिपत्रक जारी केले आहेत. यात प्रभाग पुनर्रचना बाबतचा कार्यक्रम जारी १२ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर २३ जून रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार, प्रगणक गटांची मांडणी ११ जूनपासून करून स्थळ पाहणीच्या काम १९ जून ते ०४ जुलै या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर गुपग मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यासाठी ०५ ते १० जुलै २०२५ ची मुदत देण्यात आली आहे. मात्र, याच गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्याचे सॉफ्टवेअर नसल्याने हा कार्यक्रम वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Local Body Election)
(हेही वाचा – Shaktipeeth Expressway : तब्बल २० हजार ७८७ कोटींच्या तरतुदीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय)
मुंबई महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच हे सॉफ्टवेअर घेतल्यामुळे पूर्वीच्या नियोजित कार्यक्रमानुसार प्रभाग रचना करण्यास प्रशासन सक्षम असले तरी इतर महापालिकेकडे ही यंत्रणा नसल्याने मुदतवाढ देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुधारित कार्यक्रमानुसार सर्वच महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय असून त्याच दृष्टीकोनातून प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे तसे झाल्यास नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Local Body Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
