रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची १० फेब्रुवारी रोजी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर यावेळी उभयनेत्यांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या किमान दोन जागा देणे आवश्यक आहे. शिर्डी हा राखीव मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी असल्याचे आठवले यांनी या भेटीत सांगितले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : गोंदिया नगर परिषद भवनसाठी ३० कोटींचा निधी मंजूर)
लोकसभेच्या दोन जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्या –
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभलेला रिपब्लिकन (Ramdas Athawale) पक्ष नोंदणीकृत पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या दोन जागा निवडून आल्यास रिपब्लिकन पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह मिळून तो मान्यताप्राप्त पक्ष होईल. त्यामुळे महाराष्ट्रात शिर्डी आणि आणखी एक जागा अशा दोन लोकसभेच्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात ही रिपब्लिकन पक्षाची (Ramdas Athawale) मागणी आहे.
(हेही वाचा – FIH Pro Hockey League : प्रो हॉकी लीगमध्ये भारताची नेदरलँड्सवर मात)
आठवले कडून जे पी नड्डा यांना निमंत्रण –
तसेच येत्या ४ मार्च रोजी लखनौ येथे रिपब्लिकन पक्षाच्या (Ramdas Athawale) वतीने आयोजित महामेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आठवले यांनी नड्डा यांना दिले. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्यायला हव्यात. यामुळे एन डी ए चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मान मिळेल. देशभर दलित बहुजन रिपब्लिकन जनतेचे मतदान मिळून भाजपच्या उमेदवारांना ही अधिक मोठया मतांनी विजयी होता येईल याबाबत आठवले यांनी नड्डा यांच्या कडे रिपब्लिकन पक्षाची (Ramdas Athawale) भूमिका मांडली असल्याची माहिती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community