Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

विंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने नाबाद १२० धावांची खेळी साकारली.

201
Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

टी-२० क्रिकेटमध्ये आपणच सर्वोत्तम फलंदाज आहोत हे ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा दाखवून दिलं. ३५ वर्षीय मॅक्सवेलने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ५० चेंडूंत शतक साजरं केलं. आणि नाबाद १२० धावा करत ऑस्ट्रेलियालाही ४ बाद २४१ अशी धावसंख्या गाठून दिली. (Glenn Maxwell)

नेहमीप्रमाणे संघ अडचणीत असताना मॅक्सवेल मैदानात आला. आणि तिथून त्याने डावही सावरला आणि त्याला आकारही दिला. ३ बाद ६४ अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था होती. पण, मॅक्सवेलने खेळाचा नूरच पालटला. ५५ चेंडूंत नाबाद १२० धावा करताना त्याने ८ षटकार आणि १२ चौकार लगावले. (Glenn Maxwell)

(हेही वाचा – FIH Pro Hockey League : प्रो हॉकी लीगमध्ये भारताची नेदरलँड्सवर मात)

सूर्यकुमार यादव ४ शतकांसह या स्थानावर

मॅक्सवेलला टीम डेव्हिने ३१ धावा करत चांगली साथ दिली. मॅक्सवेलने आता १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३० च्या सरासरीने २,४०५ धावा केल्या आहेत. आणि यात ५ शतकं तर १० अर्धशतकं ठोकली आहेत. टी-२० प्रकारात ५ आंतरराष्ट्रीय शतकं करणारा रोहित शर्मा नंतर तो दुसरा फलंदाज आहे. आणि यात मॅक्सवेलचा स्ट्राईटरेट तगडा १५५ इतका आहे. (Glenn Maxwell)

रोहित शर्माने ५ शतकं केली आहेत ती १५५ सामन्यांत. आणि यात त्याचीही सरासरी ३३ इतकी तगडी आहे. आणि स्टाईकरेट आहे १३९ धावांचा. या दोघांच्या खालोखाल भारताचा सूर्यकुमार यादव हा ४ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आणि सूर्यकुमारने त्यासाठी अवघे ६० सामने खेळले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यांत विंडिजवर ३४ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Glenn Maxwell)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.