FIH Pro Hockey League : प्रो हॉकी लीगमध्ये भारताची नेदरलँड्सवर मात

पेनल्टी शूटआऊटमध्ये गोली श्रीजेशचा भक्कम बचाव भारताला विजयी करून गेला. 

187
FIH Pro Hockey League : प्रो हॉकी लीगमध्ये भारताची नेदरलँड्सवर मात
  • ऋजुता लुकतुके

प्रो हॉकी लीगच्या पहिल्या सामन्यात भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलँड्सचा ४-२ असा पराभव केला. सामना शेवटपर्यंत रंगला. आणि अखेर पेनल्टी-शूटआऊटमध्ये निकाल लागला. इथं पी आर श्रीजेशने वाचवलेले दोन गोल भारताला विजय मिळवून देणारे ठरले. तोपर्यंत सामना २-२ अशा बरोबरीत होता. पण, भारतीय संघाने आपले गोल केले. आणि श्रीजेशनं डच गोल अडवले. (FIH Pro Hockey League)

शूटआऊटमध्ये भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुखजित सिंग, ललित उपाध्याय आणि समशेर सिंग यांनी गोल केले. निर्धारित वेळेत भारताकडून हार्दिक सिंगने १३ व्या मिनिटाला तर हरमनप्रीतने ५८ व्या मिनिटाला गोल केले. (FIH Pro Hockey League)

(हेही वाचा – Sumit Nagal in Top 100 : चेन्नई ओपन जिंकून सुमित नागल क्रमवारीत पहिल्या शंभरात)

हरमनप्रीतचा हा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता

सामन्यात खरंतर नेदरलँड्सने आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या ८ मिनिटांत त्यांनी गोल जाळ्यावर वारंवार हल्ले केले. पण, भारतीय बचाव भक्कम होता. आणि त्यांनी हे हल्ले परतवून लावले. १२ व्या मिनिटाला भारताला आक्रमणाची पहिली संधी मिळाली. लागोपाठ २ पेनल्टी कॉर्नर भारताने मिळवले. पण, हरमनप्रीतला या संधीचं सोनं करता आलं नाही. हरमनप्रीतचा हा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. (FIH Pro Hockey League)

या दोन गमावलेल्या संधी सोडल्या तर हरमनप्रीतचा खेळ अप्रतिम झाला. आणि एकूणच भारतीय संघाने हळू हळू सामन्यावर वर्चस्व मिळवलं. तेराव्या मिनिटालाच हार्दिक सिंगने पहिला गोल केला. मध्यंतराला नेदरलँड्सने बरोबरी साधली. पण, खेळ सुरू झाल्यावर पुन्हा एकदा भारतीय आक्रमण सुरू झालं. आणि ५८ व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. नेदरलँड्सने बरोबरी साधल्यानंतरही भारताने गोलचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. (FIH Pro Hockey League)

पण, पेनल्टी कॉर्नरवरील अपयश भारताला भोवलं. आणि सामना पेनल्टी शूटआऊटवर गेला. तिथे गोली श्रीजेशने भारताला तारलं. भक्कम बचाव करत त्याने भारताला ४-२ असा विजय मिळवून दिला. (FIH Pro Hockey League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.