Crime : गॉडमदर करिमा आपाची दहशत कायम, तुरुंगातून सुटताच साक्षीदाराला धमकी

211
Crime : गॉडमदर करिमा आपाची दहशत कायम, तुरुंगातून सुटताच साक्षीदाराला धमकी
Crime : गॉडमदर करिमा आपाची दहशत कायम, तुरुंगातून सुटताच साक्षीदाराला धमकी

पूर्व उपनगरातील ‘लेडी डॉन’ तसेच गुंड टोळ्यामध्ये गॉडमदर म्हणून कुप्रसिद्ध (Crime) असणारी करिमा शेख उर्फ करिमा आपा ही नुकतीच तुरुंगातून बाहेर आली आहे. तुरुंगातून बाहेर येताच तिने पूर्व उपनगरातून पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एका गुन्ह्यात साक्षीदार असणाऱ्या करिमा आपा आणि तिच्या गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंतनगर पोलिसांनी रविवारी करिमा शेख, हसीना शेख आणि अजीज शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

करिमा शेख उर्फ आपा ही पूर्व उपनगरातील ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखली जाते. खंडणी, सरकारी जमिनीवर कब्जा करून झोपड्या बांधणे, वीज पाणी चोरीसह चोर, दरोडेखोर, सोनसाखळी, मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना आश्रय देणे, गुन्ह्यातील ऐवज विकण्यास मदत करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्यावर विविध पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ramdas Athawale : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी घेतली नड्डांची भेट)

करिमा शेख ही घाटकोपर पूर्व कामराज नगर, नेताजी नगर परिसरात राहात असून पूर्व उपनगरात करिमा शेख हिची आणि तिच्या टोळ्यांची मोठी दहशत आहे. करिमा शेख परिसरात गुंड टोळ्या चालवते तसेच गुन्हेगारांना आश्रय देत असल्यामुळे गुंड टोळ्यांनी तिला ‘गॉडमदर’ची उपाधीही दिली आहे.

पश्चिम उपनगरातील मालाड येथे ऑगस्ट २०२३ मध्ये एका फॉरेक्स एक्सचेंज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून ७५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या दरोड्याच्या गुन्ह्यात लेडी डॉन करिमा शेख (Karima Sheikh) उर्फ आपाला अटक करण्यात आली होती. करिमा शेख हिच्याच आदेशावरून हा दरोडा टाकण्यात आला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. याप्रकरणी करिमाला अटक करून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. या गुन्ह्यात काही आठवड्यांपूर्वी तिची जामिनावर सुटका झाल्यानंतर तिने पूर्व उपनगरात (भांडुप , घाटकोपर , कांजुरमार्ग, कुर्ला, मुलुंड, नाहुर, पवई, विद्याविहार और विक्रोळी) आपली दहशत निर्माण करण्यात सुरुवात केली आहे.

शनिवारी सायंकाळी करिमाने आपल्या साथीदारासह तीच्या एका गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या साक्षीदाराला रस्त्यात अडवून ” माझ्या विरुद्ध साक्ष देणार आहे का, असे बोलून करिमाने कमरेला लावलेला सुरा काढून साक्षीदाराच्या गळ्यावर लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या तावडीतून कशीबशी सुटका करून साक्षीदाराने पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पंतनगर पोलिसांनी करिमा आणि तिच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून करिमा शेख आणि तिच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.