Ind vs Aus U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचाच अडथळा

१९ वर्षांखालील स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताला ७९ धावांनी हरवलं. 

156
Ind vs Aus U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचाच अडथळा
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषकाच्या पाठोपाठ १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियानेच भारताला दे धक्का दिला. आणि विजेतपद भारताकडून हिसकावून घेतलं. अंतिम फेरीत गतविजेत्या भारताचा ७९ धावांनी पराभव झाला. हरजस सिंगचं अर्धशतक आणि तळाला येऊन ऑलिव्हर पीकने केलेल्या ४६ धावा हे ऑस्ट्रेलियन डावाचं वैशिष्ट्य ठरलं. तर मेहली बिअरमनची गोलंदाजीही सरस ठरली. याउलट भारतीय संघासमोर २५५ धावांचं आव्हान असताना महत्त्वाच्या क्षणी भारतीय फलंदाजी कोसळली. (Ind vs Aus U19 World Cup)

या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं आहे. आधी आयसीसी कसोटी अजिंक्यपद, मग एकदिवसीय विश्वचषक आणि आता १९ वर्षांखालील विश्वचषकातील पराभव यामुळे आयसीसीच्या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत व्हावं लागलं आहे. आणि पुन्हा एकदा साखळी स्पर्धेत वर्चस्व गाजवून अंतिम फेरीत भारतीय संघ कमी पडला आहे. (Ind vs Aus U19 World Cup)

(हेही वाचा – Ramdas Athawale : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी घेतली नड्डांची भेट)

भारतीय युवा संघ इतक्या धावांत गुंडाळला गेला

या स्पर्धेत भारताला विक्रमी सहाव्या जेतेपदाची संधी होती. पण, सुरुवातीपासूनच गोष्टी बिनसत गेल्या. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. आणि निर्धारित ५० षटकांत ७ बाद २५३ अशी धावसंख्या उभारली. १९ वर्षांखालील स्पर्धेत अंतिम फेरीतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. भारतीय संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली आला. मेहली बिअर्डमनने १५ धावांत ३ आणि फिरकी गोलंदाज रॅफ मॅकमिलनने ४३ धावांत ३ बळी मिळवत भारतीय आव्हान आणखी कठीण केलं. (Ind vs Aus U19 World Cup)

आणि अखेर भारतीय युवा संघ १७४ धावांत गुंडाळला गेला. बिअर्डमननेच फॉर्ममध्ये असलेल्या मुशीर (२२) आणि उदय सहारनला बाद केलं. तिथेच भारताचा पराभव स्पष्ट झाला. भारताकडून एकट्या आदर्श सिंगने खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी केली. ७७ धावांत त्याने ४७ धावा केल्या. (Ind vs Aus U19 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.