Accident : पुण्यात खासगी बसला भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्स बस पुसदवरून पुण्याला जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली.

129
पुण्यात खासगी बसला भीषण अपघात
पुण्यात खासगी बसला भीषण अपघात

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-संभाजीनगर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण ठार झाले असून १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मालेगाव तालुक्यातील वडप फाट्याजवळ घडली.

अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्स बस पुसदवरून पुण्याला जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. या अपघातात मंगेश शेषराव तिखे (वय २५ वर्ष, रा. वाघजाळी, जि. वाशिम), अक्षय प्रभु चव्हाण (वय २३ वर्ष, साखरा, जि. यवतमाळ), दीपक सुरेश शेवाळे (वय २७ वर्ष, गणेशपूर, केनवड, जि. वाशिम), अजय भारत शेलकर (वय २३ वर्ष, कडसा जि. यवतमाळ) यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे:

सुशीला राठोड (वय २५ वर्ष) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रवी राठोड यांच्या उजवा पाय आणि हाताला दुखापत (दोघे रा. वडगाव जिल्हा यवतमाळ), संदेश चव्हाण (वय २० वर्ष वडगाव, जि. यवतमाळ यांच्या पायाला दुखापत, देवीदास आडे (वय ४० वर्ष, पन्हाळा, जि. यवतमाळ) यांचा उजवा हात जखमी, स्वाती राठोड (वय ७ वर्ष, वडगाव, जि. यवतमाळ) डोक्याला गंभीर दुखापत, रवींद्र गुंजकर (वय ३९ वर्ष, केनवड, जि. वाशिम) डावा पाय दुखापतग्रस्त, अमोल मनोहर (वय २९ यवतमाळ) डोक्याला गंभीर दुखापत, संजय राठोड (वय ४५, यवतमाळ) उजवा पाय आणि हाताला दुखापत, विठ्ठल राठोड, विठ्ठल केनवडकर, रामचरण राऊत, भीमराव वाकुडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामधील जखमींना दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा Mumbai-Goa Highway : परशुराम घाटामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.