Yezdi Roadking : येझदी रोडकिंग पुनरागमनाच्या तयारीत 

न्यायालयीन अडथळे दूर झाल्यानंतर येझदी रोडकिंग बाईक भारतात पुन्हा नवीन अवतारात येण्याच्या तयारीत आहे

82
Yezdi Roadking : येझदी रोडकिंग पुनरागमनाच्या तयारीत 
Yezdi Roadking : येझदी रोडकिंग पुनरागमनाच्या तयारीत 

ऋजुता लुकतुके

येझदी ही तगड्या आणि मजबूत बाईक बनवणारी भारतीय कंपनी आहे. आणि अलीकडेच कंपनीने भारतीय बाजारात एकामागून एक तीन नवीन बाईक आणल्या आहेत. आता आपली जुनी फ्लॅगशिप बाईक येझदी रोडकिंग पुन्हा नवीन अवतारात बाजारात आणण्याची तयारी कंपनीने चालवली आहे.

रोडकिंग हा एकेकाळी बाईकच्या बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड होता. आताही कंपनी नवीन बाईकचं डिझाईन तेच ठेवेल अशी शक्यता आहे. पण, जुन्या बाईकमध्ये आधुनिक फिचर्स मात्र दिसतील.

(हेही वाचा-Vijay Hazare Trophy : दुबळ्या त्रिपुराकडून मुंबईला दे धक्का )

कंपनीने जारी केलेल्याएका अधिकृत पत्रकात म्हटल्याप्रमाणे, ‘ही बाईक कंपनीची फ्लॅगशिप बाईक असेल आणि आताच्या येझदी बाईकपेक्षा ही बाईक अगदी वेगळी असेल.’

Insert tweet –

मॉडेलचं डिझाईन जुनं असलं तरी नवीन बाईकमध्ये पूर्णपणे एलईडी दिवेच असतील. तर बीएसए गोल्डस्टार इंजिन या बाईकमध्ये असेल. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तसंच युएसबी चार्जर या सुविधा नवीन बाईकमध्ये असतीलच. शिवाय मल्टिमोड एबीएस हे या बाईकचं वैशिष्ट्य असेल.

या बाईकमध्ये एक सिलिंडर असलेलं ६५३ सीसी क्षमतेचं इंजिन असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच ५ स्पीड गिअरबॉक्स असेल. डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ही नवीन बाईक भारतात लाँच होईल अशी शक्यता आहे.

आणि असा अंदाज आहे की या बाईकची किंमत २.६० लाख ते २.८० लाख रुपये इतकी असेल. एनफिल्ड इन्टरसेप्टर ६५० या बाईकशी तिची स्पर्धा असेल

(हेही पाहा-https://www.youtube.com/watch?v=piFAyD8oABQ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.