मरीन ड्राईव्ह परिसरात लवकरच दोन प्रसाधनगृह

155
मरीन ड्राईव्ह परिसरात लवकरच दोन प्रसाधनगृह
मरीन ड्राईव्ह परिसरात लवकरच दोन प्रसाधनगृह

मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) या भागात दोन प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत. याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार १ मे २०२३ रोजी केला. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला यावेळी दिले.

या पाहणीप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सूचना केल्या.

(हेही वाचा – Barsu Refinery: बारसू रिफायनरीसंदर्भात शासनाच्यावतीने शरद पवारांना दिला ‘हा’ शब्द)

मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरुवात करण्यात येत आहे, असेही चहल यांनी नमूद केले.

दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.