मंदिर उघडण्याबाबत लवकरच निर्णय होणार

97

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे मागील पाच महिन्यांपासून राज्यातील सर्वच मंदिर बंद आहेत. मात्र मंदिर उघडण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ला सुरुवात होणार असून, अनलॉक ४ मध्ये जिम आणि मंदिर उघडण्याबाबत निर्णय होऊ शकतो असे संजय राऊत माध्यमांशी बोलाताना म्हणालेत.

मंदिर खुली करा अन्यथा –

दरम्यान राज्यातील राजकीय नेत्यांपासून ते सर्व सामान्य नागरिकही आता मंदिरं खुली करण्याची मागणी करु लागले आहेत. देशातील अनेक धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी दिली असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही मंदिरांना कुलूप असल्याने आता मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिर्डीचे साई मंदिर १७ मार्चपासून बंद असल्याने अर्थकारण जागेवर थांबले असून, साई मंदिर सुरू करण्याची मागणी वाढत आहे. सरकारने लवकर निर्णय घ्यावा आणि साई मंदिर सुरू करावे अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई सोबत आता उपोषण करावे लागले असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील ६ महिन्यात शिर्डीचे एक हजार कोटींचे नुकसान झाले असून, सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा साई संस्थानच्या माजी विश्वस्तांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

भाजपाचे घंटानाद आंदोलन

दरम्यान भाजपा अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी सुरु करण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार, २९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी शहरात नगरात जोरदार घंटानाद आंदोलन करणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा आणि झोपलेल्या सरकारला जागे करूया असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. पवित्र श्रावण महिना आला, आणि गेला. श्रावणी सोमवारी शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्री वाहिलीच नाही. दहीहंडीच्या उत्सहाला मुरड घातली. गणपती बाप्पा आले. आता गौरी पूजनही संपन्न झाले. पण आता पुरे झाले. राज्य सरकारने आता बासच करावे. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. लवकरात लवकर देवालय सुरु करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

WhatsApp Image 2020 08 27 at 2.55.37 PM

असा बसलाय शिर्डी साई मंदिर संस्थानला फटका

मागील पाच महिन्यांपासून शिर्डीचे साई मंदिर बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागात सुमारे १००० हॉटेल्स आहेत त्यातील ४५० थ्री स्टार हॉटेल्स आहेत. ज्याचे प्रतिदिन उत्पन्न १ लाखांच्या आसपास आहे. तसेच ३५० रेस्टॉरंट असून, त्यातील १०० उत्तम दर्जाची आहेत. एवढेच नाही तर मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात दुकाने असून, ज्याचे भाडे १२ ते १५ हजार प्रतिदिन आहे.

 एकूण नुकसान 

साई मंदिर संस्थानचे दररोज १.५ करोड तर वार्षिक ३०० करोडोंचे टर्नओवर आहे. तसेच पर्यटनातून दररोज १० करोड रुपयांचे उत्पन्न मिळते.  मात्र लॉकडाऊनमुळे साई संस्थानला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.