पार्थ पवार भाजपात जाणार?

104

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरु असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत असून, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच पार्थ पवार यांची भाजपाच्या नेत्यांशी जवळीक वाढत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत सरकार स्थापन करावे अशी सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती. मात्र त्यावेळी अजित दादांची गणितं चुकली आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यात अजित दादांना अपयश मिळाले. मात्र राज्यातील सत्ता बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून, पार्थ पवार भाजपामध्ये प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अजित पवारही नाराज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे पार्थ पवार यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगितल्याने अजित पवार प्रचंड नाराज असून, पवार घराण्यात सध्या वादळ उठल्याचेही बोलले जात आहे. त्यातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर दुखावल्याचे समजत आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस?

राज्यात कोरोनाच्या काळातही भाजपाकडून ऑपरेशन लोटसच्या घडामोडी सुरु असून, आता ऑपरेशन लोटससाठी  चक्क दिल्लीश्वरांनी कंबर कसली असून, यावेळच्या ऑपरेशन लोटसची जबाबदारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या खांद्यावर असल्याची देखील चर्चा सुरु आहे. पुढील दोन महिन्यात राज्यामध्ये मोठ्या घडामोडी घडतील अशी माहिती भाजपाच्या एका बड्या नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.

अजित ‘दादां’च्या बाजूने राष्ट्रवादीचे आमदार

दरम्यान गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील सोडले तर बरेच मंत्री आणि आमदार अजित पवार यांच्या पाठिशी असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांनी अजित दादांकडे पक्षांतर्गत तक्रारीचा पाढा वाचून दाखवला असून, अजित दादांनी देखील तूर्तास शांत बसा वेळ आल्यास बऱ्याच गोष्टी घडतील असा सल्ला दिल्याचे देखील खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही असे शरद पवार म्हणाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.