मुंबईत 5 स्टार स्वच्छतागृह? मिळणार ‘या’ अनोख्या सुविधा

136
मुंबईत 5 स्टार स्वच्छतागृह? मिळणार 'या' अनोख्या सुविधा
मुंबईत 5 स्टार स्वच्छतागृह? मिळणार 'या' अनोख्या सुविधा

मुंबईची लोकसंख्या काही कोटींच्या घरात आहे. मात्र या स्वप्नांच्या नगरीत नागरिकांसाठी फक्त आठ-नऊ हजार सार्वजनिक शौचालये आहेत. त्यातील फक्त ३,२३७ शौचालये महिलांसाठी बांधण्यात आलेली आहेत.

या घडीला मुंबईत ८,५०० शौचालये नागरिकांच्या सेवेला उपलब्ध आहेत. या शौचालयांतल्या पाण्याच्या कमतरेमुळे, अस्वच्छतेमुळे आणि घाणीमुळे कोणालाही त्यांचा वापर करायला आवडत नाही. मात्र गरजेला हे शौचालय वापरण्यावाचून पर्याय नसतो. अशा पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईत बांधण्यात येणारे शौचालय नागरिकांना 5 स्टार स्वच्छतागृह वाटण्याची शक्यता आहे.

खास काय?

इतर सामान्य शौचालयांसारखे हे शौचालय लहान असणार नाही. १,४५३ फूटांच्या प्रशस्त जागेत याचा विस्तार असणार आहे. त्याच्या छप्परावर सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या ऊर्जेचा वापर शौचालयासाठी करण्यात येईल. आत पुरुषांसाठी पाच, महिलांसाठी पाच, दिव्यांगांसाठी एक शौचकूप असणार आहे. इतकंच नाही तर तो संपूर्ण विभाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात येईल. सुशोभीकरणासाठी स्वच्छागृहाच्या बाहेरच्या बाजूस फुलझाडे लावण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Byculla zoo : राणीबाग प्राणी संग्रहालयात ‘क्रॉक ट्रेल’ मगर, सुसर पाहता येणार पर्यटकांना)

या सुविधा पाहून थक्क व्हाल!

– सॅनेटरी नॅपकीन वेंडिंग मशीन
– बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष
– बाळांचे डायपर बदण्यासाठी स्वतंत्र जागा
– पिण्याच्या पाण्याची सोय
– मोबाईल चार्जिंग स्टेशन
– एटीएम
– चहा कॉफीची व्यवस्था
– इतर पेय – पदार्थ

कुठे बांधण्यात येणार?

सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले हे शौचालय मुंबईच्या गोरेगाव येथे बांधण्यात येणार आहे. गोरेगाव पूर्वेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेटजवळ याचे बांधकाम करण्यात येईल. कार्यादेश निघाल्यानंतर १२ महिन्यांत या स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.