Mumbai : मुंबईतही आहेत धोकादायक दरडी

106
  • ईश्वरी मुरुडकर

जसे महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत, विशेषतः या दरडी घाट भागात कोसळत आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगा मृत्यूस कारण ठरत आहेत का? अशी भीती निर्माण झाली आहे. मानवी अतिक्रमणामुळे आणि डोंगराळ भागात विकासकामांमुळे डोंगर रांगा ढिसूळ बनत आहेत. म्हणूनच माळीण, तळीयेनंतर इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. तब्बल २ दशकांपूर्वी घाटकोपरमध्ये दरड कोसळली होती, ज्यामध्ये मोठ्या संख्येने दरडीवर उभारलेल्या झोपड्या ढिगाऱ्याखाली आल्या होत्या. आज जो महाराष्ट्राचा उर्वरित भाग अनुभवत आहे, तो अनुभव मुंबईने आधीच घेतला होता. मात्र तरीही यातून मुंबईकर काही शिकले नाहीत. मुंबईत ज्या ज्या भागात डोंगर आहेत. त्या डोंगरावर वरपासून खालपर्यंत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.

मुंबई बनली ‘जोशीमठ’

मुंबईत डोंगरावर जशा वस्त्या उभारण्यात आल्या आहेत. तशाच वस्त्या उत्तराखंड येथील जोशीमठ या डोंगराळ भागात उभारण्यात संपूर्ण आहेत. मागच्या वर्षी हा जोशीमठ अवघ्या देशात चर्चेला आला होता. या भागात जवळपास ४ हजार घर होती, यात १७ हजार लोक राहत होते. या भागात मानवी वस्ती वाढतच चालली. बऱ्याच एजन्सींनी जोशीमठ परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली. तिथले खडक आता जंगलाविना उघडे बोडके पडले आहेत. जोशीमठ जवळपास ६ हजार मीटर उंचावर वसले आहे. पण इथली जंगलतोड करून झाडांना ८ हजार फूट मागे ढकलले. जंगलतोडीमुळे मातीची धूप आणि भूस्खलन होत आहे. पर्वतांची शिखर झाडांविना उघडी पडली आहेत, त्यामुळे या जोशीमठ येथील इमारती आणि घरे यांच्या पाण्यामधून पाण्याचे झरे सुरू झाले आहेत. या ठिकाणी भूस्खलन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अगदी अशीच स्थिती मुंबईचीही आहे. मुंबईत डोंगरांवर एक मजली, दुमजली काही ठिकाणी तर चार-चार मजली झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तेथील डोंगर कधीही खाली कोसळू शकतात.

(हेही वाचा मोदी-शहांचा विरोध करताना I.N.D.I.A आघाडीकडून भारतमातेचा अवमान; सोशल मीडियात टीकेची झोड)

कुठे आहेत मुंबईत जोशीमठ?

मुंबईतील मलबारहिल, गोरेगाव, कुर्ला, घाटकोपर, असल्फा व्हिलेज, सूर्यानगर, विक्रोळी पार्कसाइट, अॅन्टॉप हिल, चेंबूर वाशीनाका, भांडुप, मालाड आप्पापाडा, कांदिवली, कुर्ल्याचा कसाईवाड्याचा डोंगर या ठिकाणच्या डोंगर उतारावर सुमारे ३५ हजार झोपड्या दरडींवर वसल्या आहेत. काही कच्च्या तर काही पक्के बांधकाम केलेल्या या झोपड्यांवर कोणताही तोडगा पालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला नाही. मागील वर्षी पावसाळ्यात मुंबईतील डोंगरावरील २८१ ठिकाणे धोकादायक आढळली होती. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक झोपड्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र हा निर्णय अद्याप कागदावरच राहिला आहे. पावसाळा जवळ आला की पालिकेकडून या झोपड्यांच्या ठिकाणांची पाहणी केली केली जाते. धोकादायक ठिकाणावरील झोपड्यांना नोटीस बजावत झोपड्या त्वरित खाली करण्याच्या सूचना देण्यात येतात. पण कार्यवाही होत नाही. कुर्ला ‘एल’ विभागात जरीमरी, सुंदरबाग, संजय नगर, मोहिली व्हिलेज हे सर्व डोंगराळ भाग आहेत. पावसाळ्यात प्रत्येकवेळी डोंगरावरील माती पसरून अर्थात दरड कोसळून दुर्घटना घडतेच. मागील १९ वर्षांचा इतिहास पाहिल्यास २५ पेक्षा अधिक दरड कोसळण्याचा घटना या भागात घडल्या आहेत. त्यामुळे उत्तराखंड येथे जसे मानवनिर्मित चुकांमुळे येथील नागरीवस्त्या धोकादायक बनल्या आहेत. तसे मुंबईतील मोठा नागरीवस्त्यांचा भागही जोशीमठ बनला आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.