India Space Station : अंतराळात इस्रो उभारणार भारताचं स्वतंत्र स्पेस स्टेशन

गगनयान मोहीम झाल्यानंतर २०३० सालापर्यंत हे स्पेस स्टेशन उभारण्यात येईल.

22
India Space Station : अंतराळात इस्रो उभारणार भारताचं स्वतंत्र स्पेस स्टेशन
India Space Station : अंतराळात इस्रो उभारणार भारताचं स्वतंत्र स्पेस स्टेशन

चंद्रयान-३ आणि आदित्य एल-१ या दोन मोहिमा इस्रोने यशस्वीपणे पार पडल्यामुळे त्यांचं मोठ कौतुक होत आहे. त्यामुळे आता पुढची मोहीम कोणती याबद्दल सर्वांनाच कुतुहूल निर्माण झाले आहे. तर इस्रोची मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारत अंतराळात स्वतःच तिसर स्पेस स्टेशन (India Space Station) बनविणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवान यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे.
इस्रोचं संपूर्ण लक्ष सध्या आदित्य आणि गगनयान मोहिमांकडे आहे. आदित्य ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. तर, गगनयान या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात मानव पाठवणार आहे. या मोहिमांनंतर इस्रो एक अतिशय मोठा प्रोजेक्ट हाती घेणार आहे. इस्रो लवकरच अंतराळात भारताचं वेगळं स्पेस स्टेशन बनवण्याची मोहीम हाती घेणार आहे. सध्या अंतराळात एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, ज्याला १५ देशांनी मिळून बनवलं होतं.

स्पेस स्टेशन ही अंतराळात तयार करण्यात आलेली एक प्रयोगशाळा म्हणता येईल. याठिकाणी अंतराळवीर सहा-सहा महिने राहून विविध प्रकारचे संशोधन करतात. सध्या अवकाशात असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) एका वेळी कमीत कमी सात अंतराळवीर तरी असतातच. NASA, JAXA, ESA, CSA आणि ROSCOSMOS अशा विविध अंतराळ संस्थांनी मिळून ISS तयार केलं होतं.इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवान यांनी२०१९ साली या स्पेस स्टेशनची घोषणा केली होती. गगनयान मोहीम झाल्यानंतर २०३० सालापर्यंत हे स्पेस स्टेशन उभारण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. गगनयान मोहिमेतून भारतीय अंतराळवीर LEO कक्षेतच जाणार आहेत. त्यामुळे स्पेस स्टेशनसाठीचा हा पहिला टप्पा म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

(हेही वाचा : Water Storage : सर्व धरणातील पाणी साठ्यात वाढ: संभाव्य पाणी कपात टळणार)

असं असेल भारताचं स्पेस स्टेशन
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे तब्बल 450 टन वजनाचं आहे, तर चीनचं स्पेस स्टेशन 80 टन वजनाचं आहे. इस्रो जे स्पेस स्टेशन बनवेल, ते सुमारे 20 टन वजनाचं असणार आहे. यामध्ये एका वेळी चार ते पाच अंतराळवीर राहू शकतील. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या LEO कक्षेमध्ये हे स्पेस स्टेशन प्रस्थापित केलं जाईल.

NASA आणि ISRO या संस्थांमध्ये करार
भारताचं स्पेस स्टेशन तयार होण्यापूर्वीच अमेरिकेने यासाठी भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याचं कबूल केलं आहे. यासाठी NASA आणि ISRO या संस्थांमध्ये करार देखील झाला आहे. सर्व काही सुरळीतपणे पार पडल्यास, 2024 साली दोन भारतीय अंतराळवीर हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर देखील जाऊ शकतात. चंद्रयान-३ मोहिमेच्या लाँचिंगपूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौरा केला होता. यावेळी भारताने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली होती. यासोबतच नासा आणि इस्रोच्या करारानुसार, भारत चंद्रयान-३ चा डेटा अमेरिकेसोबत शेअर करणार आहे. तर, अमेरिका आपल्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देणार आहे.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.