Pahalgam Terrorist Attack चा पर्यटनाला फटका ; १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट

Pahalgam Terrorist Attack चा पर्यटनाला फटका ; १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट

92
Pahalgam Terrorist Attack चा पर्यटनाला फटका ; १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट
Pahalgam Terrorist Attack चा पर्यटनाला फटका ; १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. (Pahalgam Terrorist Attack)

पहलगाम येथील हल्ल्यानंतर किमान १५ हजार लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करीत बुधवारी विमानांचे तिकीट रद्द केले आहे. इंडिगोकडे ७,५०० एअर इंडियाकडे ५,००० तर स्पाइसजेटकडे २,५०० विनंती अर्ज आले आहेत. ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचे आहे त्यांना १००% परतावा तर ज्यांना तिकिटाचे पुनर्नियोजन करायचे आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर तिकीट रद्दचे प्रमाण सातपट अधिक वाढले आहे. (Pahalgam Terrorist Attack)

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले आहेत. श्रीनगरहून विविध राज्यांत जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर वाढवू नका असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी श्रीनगर ते मुंबई, दिल्ली तसेच अन्य ठिकाणच्या विमान तिकिटांच्या दरात दोन ते अडीचपट वाढ केली होती. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.