WTC Final 2023 : विराट-अजिंक्यची जोडी भारताला तारू शकेल का? अखेरच्या दिवशी टीम इंडियाला २८० धावांची गरज

ऑस्ट्रेलियाच्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी भारताने ३ बाद १६४ धावांपर्यंत (WTC Final 2023) मजल मारली.

116
WTC Final 2023 : विराट-अजिंक्यची जोडी भारताला तारू शकेल का? अखेरच्या दिवशी टीम इंडियाला २८० धावांची गरज

इंग्लंडमधील द ओव्हल मैदनावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवार ७ जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2023) अंतिम सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा दबदबा होता. मात्र पहिल्या सेशन्सनंतर ऑस्ट्रेलियाची पकड दिसून आली. पहिल्या सेशनमध्ये उत्तम कामगिरी करणारे भारतीय बॉलर्स नंतरच्या दोन सेशनमध्ये बॅकफूटवर गेले.

(हेही वाचाBiporjoy Cyclone : मुंबईच्या किनाऱ्यावर धुळीचे प्रचंड लोट; समुद्रही खवळलेला)

ऑस्ट्रेलियाच्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी भारताने ३ बाद १६४ धावांपर्यंत (WTC Final 2023) मजल मारली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद ७१ धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. तर चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली ४४ धावांवर तर अजिंक्य रहाणे २० धावांवर खेळत होते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारत विकेट फेकली. रोहित शर्मा ४३ तर चेतेश्वर पुजारा २७ धावांवर बाद झाला. त्यामुळे आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी एकूण २८० धावांची गरज आहे.

विराट-अजिंक्यची जोडी भारताला तारणार?

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC Final 2023) जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. याची सर्व जबाबदारी आता विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर आहे. अखेरच्या दिवशी २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग यशस्वी केल्यास भारतीय संघाकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा येईल. तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी सात विकेटची गरज आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशीचा खेळ हा रोमांचक होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.