Xiaomi ED : शाओमी इंडियाच्या दोन अधिकार्‍यांना ईडीची नोटीस

ईडीने 551 कोटी रुपयांच्या फेमा उल्लंघन प्रकरणी शाओमी (Xiaomi ED) टेक्नोलॉजी इंडिया, शाओमीचे वरिष्ठ अधिकारी आणि तीन बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

111
Xiaomi ED : शाओमी इंडियाच्या दोन अधिकार्‍यांना ईडीची नोटीस

ईडीकडून शाओमी (Xiaomi ED) या मोबाईल निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीकडून या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीकडून यावेळी ५,५५१ रुपये कोटींपेक्षा जास्त रकमेचा हिशोब मागवण्यात आला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

ईडीने 551 कोटी रुपयांच्या फेमा उल्लंघन प्रकरणी शाओमी (Xiaomi ED) टेक्नोलॉजी इंडिया, शाओमीचे वरिष्ठ अधिकारी आणि तीन बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात सीएफओ समीर राव आणि माजी एमडी मनु जैन यांचाही समावेश आहे. शाओमी इंडियाने भारतात वर्ष 2014 पासून काम करण्यास सुरुवात केली. ही कंपनी मोबाईलचं उत्पादन करणाऱ्या चीनी कंपनीची उपकंपनी आहे. शाओमी इंडियाने 2015 पासून पॅरेंट कंपनीला पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने एकूण 5551.27 कोटी रुपये पाठवल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा – NCB Raid : डोंगरीत एनसीबीचा छापा; कोट्यवधीच्या ड्रग्ज सह ‘लेडी डॉन’ अटकेत)

ईडीच्या (Xiaomi ED) म्हणण्यानुसार, सीआयटीआय बँक, एचएसबीसी बँक आणि डच बँक एजीला फेमाच्या कलम 10 (4) आणि 10 (5) चं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. परदेशात कंपनीकडून रॉयल्टीच्या रुपाने पैसे पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गेल्यावर्षी फेमाने चीन आधारित शाओमी (Xiaomi ED) ग्रुपच्या भारतीय उपकंपनीने 5551.27 कोटी रुपये जप्त केले होते. हे पैसा चिनी स्मार्टफोन कंपनीच्या बँक खात्यात होते आणि बेकायदेशीर व्यवहाराप्रकरणी फेब्रुवारीत जप्त करण्यात आले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.