NCB Raid : डोंगरीत एनसीबीचा छापा; कोट्यवधीच्या ड्रग्ज सह ‘लेडी डॉन’ अटकेत

दक्षिण मुंबईतील डोंगरी या ठिकाणी ड्रग्जचे (NCB Raid) मोठे रॅकेट कार्यरत असून हे रॅकेट मुंबईतून इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करीत असल्याची माहिती एनसीबीच्या (NCB Raid) पथकाला मिळाली होती.

121
NCB Raid : डोंगरीत एनसीबीचा छापा; कोट्यवधीच्या ड्रग्ज सह 'लेडी डॉन' अटकेत

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB Raid) दोन दिवसांपूर्वी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दक्षिण मुंबईतील डोंगरी या बालेकिल्ल्यात छापेमारी करत अमली पदार्थाचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. या प्रकरणी एनसीबीने कोट्यवधी रुपयांच्या एमडी या अमली पदार्थासह, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह एक महिला आणि तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज माफियाचा दाऊद टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

दक्षिण मुंबईतील डोंगरी या ठिकाणी ड्रग्जचे (NCB Raid) मोठे रॅकेट कार्यरत असून हे रॅकेट मुंबईतून इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करीत असल्याची माहिती एनसीबीच्या (NCB Raid) पथकाला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने या रॅकेटवर आपली नजर ठेवण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान या रॅकेटमधील एका व्यक्तीचे म्हणजेच एन. खान यांचे नाव समोर आले आहे. एनसीबीने त्याच्यावर पाळत ठेवत शुक्रवारी (९ जून) डोंगरी येथे छापेमारी करून एका घरातून २०किलो मफेड्रोन (एमडी) जप्त करून एन.अली खान याला ताब्यात घेण्यात आले.

(हेही वाचा – मुस्लिम आरक्षणासह तिहेरी तलाकवरून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान)

एन खान याच्याकडे केलेल्या चौकशीत हे रॅकेट एक महिला चालवत असून तिच्या सांगण्यावरून ड्रग्जचे मोठे सिंडिकेट डोंगरीतून चालविण्यात येत असल्याची माहिती समोर आली. एनसीबीने (NCB Raid) या महिलेचा शोध घेऊन तिच्या घरावर छापा टाकून एमडी ड्रग्ज तसेच या बेकायदेशीर धंद्यातून कमावलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक कोटी १०लाख २४ हजार रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेली महिला ही मुख्य सूत्रधार असून ती हे संपूर्ण रॅकेट चालवत होती अशी माहिती समोर आली आहे,तिच्यासोबत तिच्या तिसऱ्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

तिन्ही आरोपींची चौकशी केली असता, ते गेल्या ७ते १० वर्षांपासून या अवैधरित्या अमली पदार्थ तस्करी (NCB Raid) व्यवसायात गुंतल्याचे निदर्शनास आले. पुरवठादार महिलेचे नेटवर्क अनेक शहरांमध्ये असून तीने स्थापन केलेल्या एका कंपनीच्या मार्फत कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी करीत होती. या रॅकेट मधील काही सदस्यांवर यापूर्वी एनडीपीएस कायदा च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.