WPL 2024 : दीप्ती शर्माच्या हॅट-ट्रीकसह अष्टपैलू खेळामुळे युपी वॉरियर्सची दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेनं मात

डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ही फक्त दुसरी हॅट-ट्रीक आहे. 

114
WPL 2024 : दीप्ती शर्माच्या हॅट-ट्रीकसह अष्टपैलू खेळामुळे युपी वॉरियर्सची दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेनं मात
  • ऋजुता लुकतुके

डब्ल्यूपीएल लीगच्या (WPL 2024) शुक्रवारी झालेल्या युपी वॉरिअर्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यानच्या सामन्यात दीप्ती शर्माने एकहाती या सामन्याचं भवितव्य ठरवलं. आधी ४८ चेंडूंत ५९ धावा करत तिने युपी संघाला निदान ८ बाद १३८ अशी धावसंख्या गाठून दिली. आणि मग दिल्लीचा संघ या लक्ष्याकडे आगेकूच करत असताना तिने ४ षटकांत १९ धावा देत ४ बळी मिळवले. आणि वेळोवेळी त्यांना खिळ घातली. यात एक हॅट-ट्रीकही होती. त्यामुळे युपी संघाला निसटता एका धावेनं विजय साध्य करता आला. (WPL 2024)

डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या (WPL 2024) इतिहासातील ही फक्त दुसरी हॅट-ट्रीक ठरली आहे. दीप्तीच्या अर्धशतकामुळे युपी वॉरिअर्सने १३८ अशी धावसंख्या गाठली. ५९ धावांच्या खेळीत दीप्तीने १ षटकार आणि ६ चौकार लगावले. खरंतर दीप्तीनेच युपी संघाच्या धावसंख्येला आकार दिला असं म्हणावं लागेल. कारण, सलामीवीर ॲलिसा हिली (२९) आणि ग्रेस हॅरिस (१४) यांचा अपवाद वगळला तर एकानेही दुहेरी धावसंख्याही गाठली नाही. पण, दीप्तीने ७५ मिनिटं फलंदाजी करत युपी वॉरियर्स संघाचा डोलारा सांभाळला. (WPL 2024)

(हेही वाचा – Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी नीरज चोप्राने केली ‘ही’ मोठी घोषणा )

दिल्लीसाठी खरंतर मॅग लॅनिंग (६६) आणि शेफाली वर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर ॲलिस कॅपसी (१५) आणि जेमिमा रॉडरिग्जनेही (१५) चांगला प्रतिकार केल्यामुळे दिल्ली संघ ४ बाद ११२ अशा सुस्थितीत होता. आणि त्यांना विजयासाठी फक्त ३७ धावांची गरज होती. पण, पुन्हा एकदा दीप्ती शर्मा त्यांच्या मार्गात आडवी आली. यावेळी चेंडू हातात घेऊन. दिल्लीचे शेवटचे ७ गडी ४४ धावांत बाद झाले. (WPL 2024)

(हेही वाचा – Maldives : मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मागितली माफी; म्हणाले मी पंतप्रधान मोदींचा समर्थक)

सगरलँडचा उडवला त्रिफळा

दीप्तीने आधी लेनिंगचा मोलाचा बळी मिळवलाच होता. त्यानंतर १९ व्या षटकांत तिने हॅट ट्रीक करून दिल्लीचं उरलं सुरलं आव्हानही संपवलं. सदरलँड, अनुराधा रेड्डी आणि शिखा पांडे यांना तिने लागोपाठच्या चेंडूंवर बाद केलं. आणि तिथेच युपी संघासाठी विजयाच्या आशा निर्माण झाल्या. सगरलँडचा तिने त्रिफळा उडवला. तर अनुराधाचा झेल हॅरिसने पकडला. आणि शिखा पांडेला तर दीप्तीने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (WPL 2024)

शेवटच्या षटकात विजयासाठी १० धावा हव्या असताना, हॅरिसनेही दोन गडी बाद केले. आणि एक धावचीतही केला. त्यामुळे शेवटी दिल्लीचा संघ शेवटच्या षटकांत ८ धावांच करू शकला. आणि त्यांचा पराभव झाला. (WPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.