WPL 2023 : महिला आयपीएलच्या विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?

108

महिला प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामाला मार्च महिन्यात सुरूवात झाली असून आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. २६ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून पहिल्या महिला आयपीएलच्या विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

( हेही वाचा : आशिया कपचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे; भारतीय संघासाठी असेल का विशेष वेळापत्रक? )

आयपीएलच्या विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?

४ मार्च २०२३ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये ५ संघ सहभागी झाले होते. यंदा या स्पर्धेत एकूण २० सामने खेळवले गेले असून या ५ संघांपैकी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स या ३ संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये दिल्ली संघ नेट रनरेटमुळे थेट अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तर २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या संघांमध्ये सेमी फायनल खेळवण्यात येणार आहे.

महिला प्रिमियर लीगच्या विजेत्या संघाला ६ कोटी रुपयांची प्राईज मनी देण्यात येणार आहे. यासोबतच उपविजेता संघ आणि प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या रनर संघाला अनुक्रमे ३ कोटी आणि १ कोटींचे प्राईज देण्यात येईल. त्यामुळे यंदा कोणता संघ विजेतेपदाचा मान मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.